Chalisgaon : चाळीसगावात मोटारसायकल चोरट्यांवर एलसीबीचा दणका; चोरीचा गुन्हा उघड

चाळीसगाव : स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत केली आहे. तसेच स्वतंत्र कारवाईत आणखी एक संशयित इसम ताब्यात घेऊन त्याच्याकडून विनानंबरची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात (Chalisgaon City Police Station) दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राहुल सुभाष भिसे (रा. हनुमानसिंग नगर, चाळीसगाव) याने HF डिलक्स मोटारसायकल चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.


पुढील तपासात भिसे याने चोरीची दुचाकी प्रशांत दीपक राजपूत (रा. हरिगिरी बाबा नगर, पाचोरा रोड) याला विकल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एकूण सुमारे ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.



दरम्यान, गुन्हेगार शोध मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अहिल्याबाई होळकर चौक परिसरात एक इसम विनानंबर मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न दिल्याने प्रशांत दत्तात्रय राठोड (वय २७, रा. यशवंतनगर रोड, चाळीसगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड मोटारसायकल जप्त करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी त्याला चाळीसगाव शहर पोलिसांच्या (Chalisgaon City Police) ताब्यात देण्यात आले आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कवकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक शेखर डोंभळे तसेच लक्ष्मण पाटील, राहुल पाटील आणि भूषण पाटील यांनी सहभाग घेतला.


स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर