Dhule-Solapur highway : भरधाव कारने दुचाकीला उडवले; १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

आडूळ (ता. पैठण): धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ फाटा येथे बुधवारी (दि. १७) दुपारी भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पार्थ अर्जुन गिरी (वय १९, रा. खादगाव) हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.



नेमकी घटना कशी घडली?


मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ गिरी हा आपल्या दुचाकीने (एमएच २० बीएम ५४३४) पांढरीकडून आडूळच्या दिशेने जात होता. दरम्यान, आडूळ फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एमएच २१ बीव्ही ८२५६) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी सुमारे १० ते १५ फूट हवेत उडून रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. त्यानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यालगतच्या मोसंबीच्या बागेत शिरून थेट एका झाडावर जाऊन धडकली.



कारमधील संशयित पसार


अपघातानंतर कारमधील सर्वजण घटनास्थळावरून तातडीने पसार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली होती. अपघाताची माहिती मिळताच आडूळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या '१०२' रुग्णवाहिकेचे चालक विजय भालेराव यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी पार्थला तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलवले.



पोलिसांकडून तपास सुरू


या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार रंजितसिंग दुल्हत पुढील तपास करत आहेत. भरधाव वाहनांमुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत असून, वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.