Chandrashekar Bawankule : ‘ऑपरेशन टायगर’शी भाजपचा संबंध नाही!

चंद्रशेखर बावनकुळे; उद्धव ठाकरेंनी पक्ष का फुटतोय याचे आत्मचिंतन करावे


मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटण्यामागे भाजपचा हात असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले असून, 'ऑपरेशन टायगर'शी भाजपचा दूरान्वये संबंध नाही', असा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा निर्णय ते स्वतः घेतील आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा निर्णय घ्यावा. मात्र, ठाकरे यांचे लोक त्यांना का सोडून जात आहेत, याचे आत्मचिंतन त्यांनी स्वतः करावे, असा खोचक टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे.


माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 'ऑपरेशन टायगर' सुरू असल्याच्या चर्चा आहेत. या विषयाशी भाजपचा संबंध नाही, त्यावर आमच्या नेत्यांनी बोलणे योग्य ठरणार नाही. या ऑपरेशनबाबत आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला. प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःचा विस्तार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पक्ष वाढवावा आणि उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष सांभाळावा, असे बावनकुळे यांनी सांगितले.स्वतःचे लोक पक्ष सोडून का चालले आहेत, याचे उत्तर ठाकरेंनी शोधले पाहिजे. दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आपल्या पक्षात नेमकी काय गडबड आहे, याचे आत्मचिंतन त्यांनी करावे, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला. भाजप महायुतीचा घटक पक्ष म्हणून या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, असेही त्यांनी सांगितले.(Opration Tiger)

Comments
Add Comment

US Ambassador : जम्मू- काश्मीर हा भारताचा एक महत्त्वाचा भाग- सर्जिओ गोर

श्रीनगर : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी (१९ ऑगस्ट) श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Daund electricity two brother die : दौंडमध्ये काळीज पिळवटणारी घटना; विजेचा धक्का बसून दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू, आई सुदैवाने बचावली

पुणे : पावसाळ्याच्या दिवसांत विजेच्या उपकरणांबाबत सुरक्षितता बाळगणे किती गरजेचे आहे, याचा एक अत्यंत हृदयद्रावक