NCP Vaishali Nagawade : वैशाली नागवडेंना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची लॉटरी?

- 'देवगिरी'वर मध्यरात्री खलबते; संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होणार


मुंबई : रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर, आता या रिक्त पदावर वैशाली नागवडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी मध्यरात्री महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आणि रिक्त पदे भरण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यावर ज्येष्ठ नेत्यांचे एकमत झाले असून, वैशाली नागवडे यांच्या रूपाने पक्षाला नवा महिला चेहरा मिळण्याची चिन्हे आहेत.



नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदासह राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. 'देवगिरी'वरील या बैठकीला ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षपदासह युवक, विद्यार्थी आणि युवती विभागातील फेरनियुक्त्यांवर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची विश्वासनीय माहिती आहे.


पक्षाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी महिला प्रदेशाध्यक्ष आणि युवक अध्यक्ष या अत्यंत महत्त्वाच्या व प्रभावी पदांवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे नेत्यांनी ठरवले आहे. दुसरीकडे, विद्यार्थी अध्यक्ष आणि युवती अध्यक्ष या पदांवर मात्र सध्या कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनाच पुन्हा संधी देत त्यांची फेरनियुक्ती करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत/



महिला आयोगाबाबत निर्णय प्रलंबित


- सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी वैशाली नागवडे, युवक अध्यक्ष पदासाठी निखिल ठाकरे आणि विद्यार्थी अध्यक्ष म्हणून आकाश झांबरे (फेरनियुक्ती) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते.
- राष्ट्रवादीच्या कोट्यातील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करावी, याबाबत या बैठकीत निर्णय होऊ शकलेला नाही. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर या पदासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, डॉ. ज्योती मेटे आणि सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीय वैशाली मोठे यांची नावे चर्चेत आहेत.
- त्याचप्रमाणे शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांच्या नावाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन या पदावर नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर चर्चिला गेल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी बैठकीत दिली.

Comments
Add Comment

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Antara Banerjee : अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये आरपीएफ जवानांवर केला रेझरने हल्ला

मुंबई : मॉडेल आणि वेब सिरीज अभिनेत्री अंतरा बॅनर्जी (३१) हिला १२ ऑगस्ट रोजी अरवली एक्सप्रेसमध्ये जागेचे आरक्षण

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष