महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत त्यात आता अरबी समुद्रामुळे मान्सूनचे ढग गायब झाले आहे. जून महिना संपायला आला तरी अजून पर्यत पावसाने हजेरी लावली नाही. उष्णतेचे प्रमाण उष्णतेचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे . १५ ते २० जूनपर्यंत मान्सून पुन्हा सक्रिय होईल असं स्कायनेटनं सांगितलं. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात ढगाळ वातावरण आहे पण पाऊस गायब झाला आहे. याचं कारण म्हणजे अल निनोचा परिणाम आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला आहे.
Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या
मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मात्र विविध यंत्रणांमधील समन्वय वाढवून ...
एल निनोमुळे पाऊस रखडला ...
एल निनोमुळे पाण्याचे तापमान वाढते. महाराष्ट्रात मान्सून रेंगाळल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 20 जूनच्या आसपास राज्यात मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. पण स्कायमेट या खासगी संस्थेने महाराष्ट्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये केवळ हलक्या सरी कोसळतील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्याच सोबत विदर्भातील नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
Nashik Water Crisis : ३१ ऑगस्टपर्यंत पाणी जपून वापरा; धरणातील साठा राखीव ठेवण्याचे शासनाचे आदेश
नाशिक: 'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे आगमन लांबल्याने आणि धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावत असल्याने, नाशिकसह संपूर्ण राज्यात पाणीटंचाईचे ...
हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार महासागरात एल निनो सक्रिय झाला आहेआहे मात्र याचे कोणतेही संकेत सध्या दिसत नाहीत.इंडियन ओशन डायपोल जर सक्रिय झाला तर मात्र एल निनोचा प्रभाव कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. इंडियन ओशन डायपोल हे हिंदी महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानातील चढ-उतार दर्शवणारे एक हवामान चक्र आहे. समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि एल निनोचा प्रभाव असूनही संपूर्ण भारतात मान्सूनचे आगमन होण्यासाठी जुलैचा पहिला किंवा दुसरा आठवडा उजाडण्याची शक्यता स्कायमेट या खासगी संस्थेने व्यक्त केली आहे.