Tuesday, June 16, 2026

Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

 राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यात, सिडकोच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेल्या विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर, दिपेंद्र सिंह कुशवाह यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आहे. मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या अश्विनी जोशी यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या अतिरिक्त महानगर आयुक्त पदावर वर्णी लागली आहे.

http://prahaar.in/2026/06/16/central-government-sanctions-%E2%82%B9733-28-crore-for-the-modernization-of-the-maharashtra-police-force/

विजय सिंघल यांच्या जागी सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी सध्या एमएमआरडीच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी असलेल्या अश्विन मुद्गल यांची करण्यात आली आहे. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी असलेल्या पी. वेलरासू यांची सचिव (वने), महसूल व वन विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. कादंबरी बलकवडे यांची उद्योग संचालनालयात विकास आयु्क्त (उद्योग) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरील संजय काटकर यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आयुक्त (कुटुंब कल्याण) पदी नियुक्ती झाली आहे. तर केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन राज्य सरकारकडे रूजू झालेल्या प्राजक्ता वर्मा यांची मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा