Made in India : दोन भारतीय इंजिनिअर्सनी उभी केली १४,१४५ कोटींची 'युनिकॉर्न' कंपनी

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जागतिक स्पर्धेत सध्या अमेरिकन कंपन्यांचा दबदबा आहे. मात्र, या शर्यतीत आता दोन भारतीय तरुणांनी इतिहास रचला आहे. विवेक राघवन आणि प्रत्युष कुमार या दोन इंजिनिअर्सनी अवघ्या ३ वर्षांत 'सर्वम एआय' (Sarvam AI) या स्टार्टअपच्या माध्यमातून 'युनिकॉर्न' क्लबमध्ये धडक मारली आहे. नुकत्याच झालेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे या कंपनीचे मूल्यांकन थेट १.५ बिलियन डॉलर (सुमारे १४,१४५ कोटी रुपये) वर पोहोचले आहे.




भारतीय भाषांसाठी 'ब्रह्मास्त्र'


गुगलचे 'जेमिनी' किंवा ओपनएआयचे 'चॅटजीपीटी' हे जागतिक स्तरावर प्रगत असले, तरी भारतीय भाषांच्या बाबतीत त्यांची अचूकता मर्यादित असते. ही पोकळी ओळखून विवेक राघवन आणि प्रत्युष कुमार यांनी नोकऱ्या सोडून 'सर्वम एआय'ची सुरुवात केली. त्यांनी १० पेक्षा जास्त भारतीय भाषांवर प्रभुत्व असलेले विशेष 'कस्टमाइज्ड एआय मॉडेल' विकसित केले आहे.




एचसीएल टेकची मोठी गुंतवणूक


या स्टार्टअपच्या क्रांतीकारी मॉडेलवर विश्वास दाखवत देशातील दिग्गज आयटी कंपनी 'एचसीएल टेक' (HCL Tech) ने तब्बल १,४२७ कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली आहे.





  • इक्विटी भागीदारी: या गुंतवणुकीच्या बदल्यात एचसीएल टेकला सर्वम एआयमध्ये १०.४६% भागीदारी मिळाली आहे.




  • फंडिंग: 'सिरीज बी' फंडिंग राउंडमधून कंपनीने आतापर्यंत २३४ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे.






सर्वम एआय का आहे खास?


सर्वम एआयची तांत्रिक क्षमता विदेशी कंपन्यांना टक्कर देणारी आहे:





  • नैसर्गिक संवाद: हे मॉडेल केवळ मशीनरी भाषेत नाही, तर भारतीय म्हणी आणि मानवी संवादातील भावनिक संदर्भ अचूकपणे समजून घेते.




  • अचूकता: 'सर्वम विजन' आणि 'बुलबुल V3' यांसारख्या मॉडेल्सनी काही तांत्रिक चाचण्यांमध्ये चॅटजीपीटी आणि जेमिनीलाही मागे टाकले आहे.




  • क्षमता: ३ अब्ज पॅरामीटर्सवर आधारित हे मॉडेल फोटो, हाताने लिहिलेला मजकूर आणि आवाजाचे अचूक विश्लेषण करू शकते.






बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात दबदबा


'सर्वम एआय'ची उपयुक्तता ओळखून भारतातील मोठ्या वित्तीय संस्थांनी त्यांचा वापर सुरू केला आहे. यामध्ये एसबीआय लाईफ, एलआयसी, आयडीएफसी फर्स्ट बँक, टाटा कॅपिटल आणि क्रेड सारख्या अग्रगण्य नावांचा समावेश आहे.



भारतासाठी मोठी संधी


एचसीएल टेकच्या पाठिंब्यामुळे आता सर्वम एआयला जागतिक बाजारपेठेत आपले पाय घट्ट रोवण्याची संधी मिळणार आहे. भविष्यात १५० बिलियन डॉलरच्या भारतीय एआय क्षेत्राचे नेतृत्व करण्याचे ध्येय या कंपनीने ठेवले आहे. दोन भारतीय तरुणांची ही कामगिरी केवळ स्टार्टअप विश्वातच नाही, तर जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा ठसा उमटवणारी ठरली आहे.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)