Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज मंत्रालयात घेतला.


यावेळी आवश्यक चॅनेल व संरक्षण बंधारा उभारणी तसेच थळ-नवगाव परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.



मौजे नवेदार-नवगाव येथील मत्स्य जेट्टी तसेच अलिबाग येथील रेवस-मांडवा प्रवासी जेट्टीच्या प्रलंबित विषयांचाही आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांशी संबंधित विविध बाबींची सद्यस्थिती तपासून प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याबाबतही मंत्री राणे यांनी सूचना केल्या.


बैठकीस आमदार महेंद्र दळवी, महाराष्ट्र सागरी मंडळ चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप,महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले तसेच आरसीएफ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Antara Banerjee : अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये आरपीएफ जवानांवर केला रेझरने हल्ला

मुंबई : मॉडेल आणि वेब सिरीज अभिनेत्री अंतरा बॅनर्जी (३१) हिला १२ ऑगस्ट रोजी अरवली एक्सप्रेसमध्ये जागेचे आरक्षण

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा