Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची मुंबईकरांना प्रतीक्षाच! २० जूनपर्यंत पाऊस लांबण्याची शक्यता; पाणी कपातीचं संकट गडद

मुंबई : मुंबईकरांना यंदा मान्सूनसाठी नेहमीपेक्षा अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. साधारणपणे ७ ते ८ जूनदरम्यान मुंबईत दाखल होणारा मान्सून १५ जून उलटल्यानंतरही शहरापासून दूरच आहे. त्यामुळे उष्णता, वाढलेली आर्द्रता आणि पाणीटंचाईच्या संभाव्य संकटामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)


मान्सूनने काही दिवसांपूर्वी तळकोकण आणि रत्नागिरी गाठले होते. त्यामुळे लवकरच मुंबईतही पावसाचे आगमन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यानंतर मान्सूनची प्रगती मंदावली असून त्याच्या वाटचालीला तात्पुरता ब्रेक लागल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ ते २० जूनदरम्यान दक्षिण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून त्यानंतरच तो मुंबईकडे सरकू शकतो. (Maharashtra Monsoon Weather Alert)


दरम्यान, पावसाच्या अनुपस्थितीमुळे मुंबईतील उकाडा कायम आहे. सोमवारी सांताक्रूझ येथे ३५.२ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे ३.१ आणि ३.५ अंशांनी अधिक होते. किमान तापमानात काहीशी घट झाली असली तरी हवेतील ६० ते ७० टक्के आर्द्रतेमुळे नागरिकांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारीही हवामानात विशेष बदल होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)



मान्सूनच्या उशिरामुळे आता मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबतही चिंता वाढली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा हळूहळू कमी होत असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास ही कपात वाढवून २० टक्क्यांपर्यंत नेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)



महापालिका प्रशासनाकडून धरणांतील पाणीसाठ्याचा नियमित आढावा घेतला जात असून अंतिम निर्णय हवामानाच्या पुढील स्थितीवर अवलंबून असेल. पावसाचा विलंब कायम राहिल्यास पाणी व्यवस्थापनासाठी अधिक कठोर उपाययोजना लागू केल्या जाऊ शकतात. यामुळे आता मुंबईकरांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, मान्सून कधी दाखल होणार आणि उकाडा व पाणीटंचाईपासून कधी दिलासा मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०