Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कामांत दिरंगाईवर मनपा आक्रमक! आणखी तीन ठेकेदारांना नोटिसा

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील विकासकामे मात्र दिरंगाईने सुरु असल्याचे चित्र आहे. अशातच आता मनपा आक्रमक झाली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईविरोधात महापालिकेच्या बांधकाम विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वी चार ठेकेदारांना दंडात्मक नोटिसा बजावल्यानंतर आता आणखी तीन ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांना प्रतिदिन १० हजार रुपयांचा दंड आकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.


सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Kumbh Mela) भाविक तसेच साधू-महंतांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने विविध विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. महापालिकेमार्फत पहिल्या टप्प्यात शहरातील २८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून, ही सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.



सिंहस्थ कामांत दिरंगाईवर मनपा आक्रमक


महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून (Municipal Corporation's Construction Department) या कामांवर नियमित देखरेख ठेवली जात असली, तरी काही रस्ते प्रकल्पांमध्ये अपेक्षित वेगाने काम होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अर्थातच कामात दिरंगाई होत आहे. त्यामुळे कामात विलंब करणाऱ्या ठेकेदारांविरोधात मनपा आक्रमक झाली असून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. याआधी ८ जून रोजी चार ठेकेदारांना नोटिसा (Notices) बजावण्यात आल्या होत्या.


सोमवारी (दि.१५) स्वस्तिक इन्फ्रा लिमिटेड (Swastik Infra Limited) , एम. टी. पाटील कन्स्ट्रक्शन (M. T. Patil Construction) आणि पवार-पाटकर कन्स्ट्रक्शन कंपनी (Pawar-Patkar Construction Company) या तीन ठेकेदारांना नव्याने नोटिसा बजावण्यात आल्या. यामध्ये स्वस्तिक इन्फ्रा लिमिटेडकडे दोन रस्त्यांची कामे असल्याने संबंधित कंपनीवर प्रतिदिन २० हजार रुपयांच्या दंडाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.


महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल (Sanjay Agarwal) यांनी सांगितले की, सिंहस्थाशी संबंधित सर्व विकासकामे विहित मुदतीत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी सातत्याने कामांचा आढावा घेतला जात असून, ज्या ठिकाणी विलंब होत असल्याचे दिसून येत आहे, त्या ठेकेदारांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे