मुंबई : नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि वर्चस्वाची लढाई मुख्यमंत्र्यांच्या दारात पोहोचली आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी (१६ जून) मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत वनमंत्री गणेश नाईक यांची तक्रार केली. नाईक हे आपल्या मतदारसंघात घुसखोरी करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
Nashik : रिक्षातून ९ लाखांचे दागिने चोरी, रिक्षाचालक ताब्यात
चाळीसगाव : रिक्षातून प्रवास करतांना नाशिक येथील महिला प्रवाशाकडील बॅगेतील सुमारे 9 लाख 37 हजार 500 रूपये किंमतीचे दागिने चोरी झाले होते. या प्रकरणात ...
सोमवारी (१५ जून) नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य विषयक सुविधांच्या लोकार्पण कार्यक्रमावरून या वादाची ठिणगी पडली. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव गायब असल्यामुळे महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत आधीच तीव्र नाराजी पसरली होती. त्यातच स्थानिक आमदार असूनही आपल्याला विश्वासात न घेता आणि राजशिष्टाचाराला हरताळ फासत हा सोहळा उरकला गेल्याचा आरोप करत आमदार मंदा म्हात्रे यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. ही नाराजी इथेच न थांबवता म्हात्रे यांनी मुंबई गाठून मुख्यमंत्र्यांकडे नाईक यांच्या कार्यपद्धतीचा पाढा वाचला.
Cough Syrups : औषधांच्या नियमात मोठा बदल; कफ सिरपसाठी आता डॉक्टरांची 'चिठ्ठी' बंधनकारक!
नवी दिल्ली : देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. आता देशभरातील फार्मसी ...
या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रे यांनी मंत्री गणेश नाईक यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. "२००४ मध्ये मी जेव्हा आमदार नव्हते, तेव्हा गणेश नाईक मला विचारत असत की, मी इथला आमदार असताना तुम्ही मला न विचारता कामे कशी करता? आज तोच प्रश्न मी त्यांना विचारत आहे की, मी या भागाची विद्यमान आमदार आहे, मग मला अंधारात ठेवून तुम्ही कामे कशी काय करू शकता?" असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला. कोकण किनारपट्टीवर आगरी आणि ओबीसी समाजाची आपण एकमेव महिला आमदार असून आपल्याला मुद्दाम दुखावले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
आधी स्वतःचा मतदारसंघ सांभाळा
मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधताना म्हात्रे म्हणाल्या, "तुमच्या स्वतःच्या ऐरोली मतदारसंघात काय चालले आहे ते आधी बघा, तिथले त्रस्त लोक कामे घेऊन माझ्याकडे येत आहेत. आमच्या प्रत्येक चांगल्या कामात खो घालण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी आहेत, याची जाणीव संबंधितांनी ठेवावी," असा इशारा देत मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. आता मुख्यमंत्री या अंतर्गत वादावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.