Sanchita Ugale : संध्याकाळी साडेपाच नंतर असं काय घडलं की संचिताने टोकाचं पाऊल उचललं ?

नालासोपारा : 'वागळे की दुनिया' आणि 'कुमकुम भाग्य' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री संचिता उगले हिने गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. संचिता मुंबईजवळील नालासोपारा परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. ती आई वडील आणि बहीण अंजली यांच्यासोबत आचोळे गावातील घरात राहत होती.



काय झालं ५:३० च्या नंतर ?

रविवारी संध्याकाळी संचिता आणि तिची बहीण दोघीच होत्या. आई बाबा काही कामासाठी बाहेर गेले होते. धाकटी बहीण अंजली सायंकाळी सुमारास 5.30 वाजता काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. घरी कोणीही नाही हे पाहून संचिताने संध्याकाळी सुमारे 7.30 च्या सुमारास घरातील बेडरूममध्ये गेली. बेडरूमला आतून कडी लावली आणि पंख्याला साडीच्या सहाय्यानं गळफास घेतला. तिची बहीण आणि आई बाबा जेव्हा घरी परत आले तेव्हा हे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने संचिताला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.



प्राथमिक तपासात घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी किंवा आत्महत्येचे कारण स्पष्ट करणारा पुरावा आढळून आलेला नाही. पण संचिताच्या चुलत भावाने एक नवा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याने एक सोशल मीडिया पोस्ट दाखवून पत्रकारांशी बोलताना संचिताची आत्महत्या आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या यात काहीतरी संबंध असल्याचा मुद्दा उपस्थित केला तसेच या प्रकरणी चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. आता पोलीस संचिताच्या आयुष्यात मागील काही दिवसांत काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. संचिता उगले आत्महत्या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के