धक्कादायक! कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री संचिता उगले हीची आत्महत्या

-राहत्या घरात गळफास घेऊन संपले जीवनयात्रा


मुंबई: टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं आत्महत्या केल्याची  माहिती समोर येत आहे. संचिता २२ वर्षांची होती आणि मुंबईजवळील नालासोपारा परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती.  (Sanchita Ugale Suicide News)


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान घडली. घटनेच्या वेळी संचिता घरी एकटी होती. कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता उगले हिने साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नसून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.


संचिता उगले ही 'कुमकुम भाग्य' आणि 'वागळे की दुनिया' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमुळे प्रेक्षकांच्या परिचयाची होती. तसेच तिने अनेक टीव्ही आणि चित्रपट प्रकल्पांमध्ये काम केले होते. विकी कौशल अभिनित 'छावा' चित्रपटात तिने ताराबाईची भूमिका साकारली होती.



तिच्या आकस्मिक निधनामुळे मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात असून, सहकलाकार आणि चाहत्यांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के