Nashik : नाशिक-शिर्डी रेल्वे प्रवास होणार सुसाट ? दुहेरी रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती

Nashik : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर नाशिकमधील पायाभूत सुविधांच्या कामांना प्रशासनाकडून वेग दिला जात आहे,. अशातच आता नाशिकरोड ते साईनगर शिर्डी (Nashik Road to Sainagar Shirdi) या दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाचीही (Railway Line Project) जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी आता भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात आली असून जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात नाशिक ते शिर्डी रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुलभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


नाशिक हे देशातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. धार्मिक, औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने नाशिक शहराचे महत्त्व मोठे आहे. सिंहस्थ कुंभमेळा, त्र्यंबकेश्वर, पंचवटी तसेच शिर्डी यांसारख्या धार्मिक स्थळांमुळे दरवर्षी लाखो भाविक नाशिकमध्ये येत असतात. नाशिकमध्ये पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध ठिकाणे आहे. त्यामुळे शहराची दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. रस्तेमार्ग, हवाई सेवा आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.



नाशिकसाठी दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्प महत्त्वाचा


याच पार्श्वभूमीवर नाशिकरोड ते साईनगर शिर्डी हा दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पासंदर्भात मध्य रेल्वेकडून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन शाखेला प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्या प्रस्तावाच्या आधारे आता प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याचे भूसंपादन समन्वय अधिकारी राजेंद्र वाघ (Rajendra Wagh) यांच्या डिजिटल स्वाक्षरीने २५ मे रोजी भूसंपादनासंदर्भातील (Land Acquisition) आदेश जारी करण्यात आले आहेत.


या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील तब्बल ३४ गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. यामध्ये सिन्नर आणि नाशिक या दोन तालुक्यांचा समावेश असून प्रकल्पाची जबाबदारी निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.



'या' गावांमध्ये भूसंपादन होणार


सिन्नर तालुक्यातील सिन्नरसह खंबाळे, कुंदेवाडी, वडझिरे, दातली, मलढोण, पाथरे खुर्द, पांगरी खुर्द, मांजरे, फुलेनगर, ब्राम्हणवाडे, मुसळगाव, देशवंडी, जायगाव, पांगरी बुद्रुक, वावी, सायाळे, पाटपिंप्री, बारागावपिंप्री, भोकणी, सुंदरपूर या गावांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे. तर नाशिक तालुक्यातील जाखोरी, देवळाली, विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, चेहेडी बुद्रुक, संसरी, मोहगाव, बाभळेश्वर, पंचक आणि चाडेगाव या गावांचाही यात समावेश आहे.


दरम्यान, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पावरून गेल्या काही वर्षांत मोठा वाद पाहायला मिळाला होता. सुरुवातीला सिन्नर, संगमनेर आणि राजगुरुनगरमार्गे हा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र नंतर या मार्गात बदल करून तो शिर्डीमार्गे प्रस्तावित करण्यात आला. त्यामुळे मूळ मार्गानुसारच रेल्वे व्हावी, या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली होती. मात्र सध्या नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत विशेष हालचाली दिसत नसताना नाशिकरोड ते साईनगर शिर्डी दुहेरी रेल्वेमार्गाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान,आता भूसंपादन प्रक्रिया कितपत वेगाने पूर्ण होते आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग