Malegaon : मालेगावातील बेकायदेशीर प्रसूती प्रकरणात मोठा ट्विस्ट ! आईच्या प्रियकरामुळेच मुलीला...

Malegaon : काही दिवसांपूर्वी मालेगाव येथून एक खळबळजनक प्रकरण समोर आले होते. येथील सटाणा नाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती करून नवजात बालिकेची विक्री करण्याचा संतापदायक प्रकार समोर आला होता. या धक्कादायक प्रकरणात रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांच्यासह ९ संशयीतांना अटक करण्यात आली असून त्यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने १६ जूनपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.



आईच्या प्रियकराकडूनच संतापजनक कृत्य


​या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांच्या हाती अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी माहिती समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीला गर्भवती करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तिच्याच आईचा प्रियकर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा संशयीत हैदराबाद येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो अशी प्राथमिक माहिती आहे. मालेगाव पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत हैदराबाद येथून पीडित मुलीच्या आईला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. या दोघांना अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



नेमकं प्रकरण काय ?


डॉ. किशोर डांगे यांच्या खासगी रुग्णालयात ७ जून रोजी एका १६ वर्षीय मुलीची प्रसूती करण्यात आली. ही मुलगी अल्पवयीन होती. त्यामुळे कायदेशीररीत्या अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असूनही रुग्णालय प्रशासनाने ‘पोक्सो’ कायद्याचे उल्लंघन केले. या गंभीर आणि तितक्याच संवेदनशील प्रकरणांची माहिती पोलिसांना किंवा आरोग्य विभागाला देणे बंधनकारक असतानाही, डॉक्टरांनी ती जाणीवपूर्वक दडपून ठेवली. धक्कादायक म्हणजे प्रसूतीनंतर मुलीची ओळख लपवण्यासाठी तिला अज्ञातस्थळी हलवण्यात आले, तर नवजात बालिकेला बेकायदेशीर विक्रीसाठी रुग्णालयातच ठेवण्यात आले होते,असा आरोप आहे.



जागरूक नागरिकांनी डाव उधळला


काही जागरूक नागरिकांना याची ​माहिती मिळताच त्यांनी पोलीस व आरोग्य प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या हॉस्पिटलवर छापा टाकत कारवाई केली. सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जितेंद्र डोलारे यांनी या संदर्भात कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी डॉ. किशोर डांगे, त्यांची मुलगी डॉ. किशोरी डांगे, डॉ. अनुजा शेवाळे, डॉ. प्रिती जाधव यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ७ जून रोजी अटक केलेल्या ९ संशयितांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना शुक्रवारी (१२ जून) पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी १६ जूनपर्यंत वाढवून दिली. या प्रकरणातील एक संशयित अद्याप फरार आहे.


दरम्यान, या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजया पवार या अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे

Jalgaon Crime News : खाऊचे आमिष अन् अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार ; चार संशयितांना अटक

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून

GeM : जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची दुहेरी बाजी; पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार

One-day Seminar : ‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ या विषयावर रंगणार एकदिवसीय परिसंवाद

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्टला होणार ध्वजारोहण मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या