Legislative Council Election 2026 : विधानपरिषद निवडणुकीआधी नागपुरातील नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांकडून 'वर्षा'वर निमंत्रण

- दगाफटका टाळण्यासाठी भाजपकडून खबरदारी; स्नेह भोजनासह रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत प्रशिक्षण


मुंबई : स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council Election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीकडे कागदावर पुरेसे संख्याबळ असले, तरी ऐनवेळी होणारा दगाफटका किंवा मतफुटी टाळण्यासाठी भाजपने विशेष खबरदारी घेतली आहे. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील भाजपच्या सर्व नगरसेवकांना मुंबईतील 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी जेवणासाठी विशेष निमंत्रण दिले आहे.


येत्या १८ जून रोजी नागपूरसह राज्यातील स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीतील संभाव्य शह-काटशहाचे राजकारण पाहता, भाजपने खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी याला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणानुसार, येत्या १७ जून रोजी 'वर्षा' बंगल्यावर सर्व नगरसेवकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दरम्यान मुख्यमंत्री स्वतः नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. त्यापूर्वी, १६ जून रोजी भाईंदर येथील 'रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी' येथे या नगरसेवकांसाठी एका विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले असून, यात निवडणुकीतील तांत्रिक बाबी आणि मतदानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. (Legislative Council Election 2026)



काही नगरसेवक गोव्यात, तर काही मुंबईकडे रवाना : 


विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतफुटीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजपने आधीच आपल्या नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. बहुतांश नगरसेवक आधीच 'सहली'च्या निमित्ताने गोव्यात तळ ठोकून आहेत. मात्र, जे नगरसेवक काही कारणास्तव गोव्याला जाऊ शकले नव्हते, ते मुख्यमंत्र्यांचे बोलावणे येताच तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबई आणि गोव्यात असलेले हे सर्व नगरसेवक मतदानाच्या दिवशी म्हणजे १८ जून रोजीच नागपुरात दाखल होणार आहेत. (Legislative Council Election 2026)



६ उमेदवार आधीच बिनविरोध : 


राज्यातील १७ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असली, तरी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये ठाण्यातून रवींद्र फाटक (शिवसेना), रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी), पुण्यातून विक्रम काकडे (राष्ट्रवादी), वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून अरुण लखाणी (भाजप), यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) आणि अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे (भाजप) यांचा समावेश आहे. (Legislative Council Election 2026)



१८ जूनला मतदान : 


उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जून रोजी संपल्यानंतर प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट झाले. आता येत्या १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल, तर २२ जून रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल हाती येणार आहे. (Legislative Council Election 2026)

Comments
Add Comment

Kashedi landslide: मुसळधार पावसाचा फटका; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यासह अनेक भागांतील रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम

उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना दरड कोसळल्याचा फटका, धुळे–मुंबई एक्स्प्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द

Train cancellations : मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. कर्जत–लोणावळा आग्नेय घाट विभागात मुसळधार पावसामुळे दरड

Nashik Rain Update : पुढील 3 तास नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस, 60-70 वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता

Nashik Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. आजही नाशिकसह अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला

Pune Landslide : पुण्यातील मावळ तालुक्यात घरावर दरड कोसळली; कुटुंब अडकल्याची भीती, NDRFचे बचावकार्य सुरू

पुणे : मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. एका

Mumbai rain news : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला, सरकारी कार्यालये अर्धा दिवस सुरू राहणार

मुंबई : मुंबईत (Mumbai) सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन

Pune Mumbai Expressway : मुसळधार पावसाचा मोठा फटका; पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि जुना महामार्ग दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद

मुंबई : राज्यातील मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक