America Plane Crash : अमेरिकेत विमान भीषण दुर्घटना; स्कायडायव्हिंग विमान कोसळून 12 जणांचा मृत्यू

अमेरिका : अमेरिकेतील मिसौरी (Missouri) राज्यात रविवारी झालेल्या भीषण विमान अपघातात (Plane crash) 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. ही दुर्घटना बटलर मेमोरियल विमानतळ (Butler Memorial Airport) जवळ घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.



प्राथमिक माहितीनुसार, विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानातील सर्व प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 11 स्कायडायव्हर्स आणि एका पायलटचा समावेश असल्याची माहिती स्थानिक आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

बटलर हे शहर कॅन्सस सिटीच्या दक्षिणेस सुमारे 60 मैल अंतरावर आहे. अपघातानंतर आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, विमान पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे बचावकार्याला मर्यादा आल्या आणि कोणालाही वाचवता आले नाही.

दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हवामानातील बदल, तांत्रिक बिघाड किंवा इतर कोणते कारण या अपघातामागे आहे का, याचा तपास सुरू आहे.



या प्रकरणाचा तपास  फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (Federal Aviation Administration) (FAA) आणि राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळ (National Transportation Safety Board (NTSB) यांच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेमागील खरे कारण समोर येणार आहे.

या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून प्रशासनाने त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
Comments
Add Comment

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

Nepal Agniveer Recruitment Rally : ‘आम्हालाही भारतीय सैन्यात भरती करा!’ अग्निवीर योजनेसाठी नेपाळचे हजारो तरुण रस्त्यावर

काठमांडू : भारतात अग्निवीर योजनेअंतर्गत तरुणांची भरती सुरू असताना नेपाळमध्ये मात्र याच योजनेत सहभागी