Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्राची पावसासाठी प्रतीक्षा वाढली! मॉन्सून पुन्हा लांबला; एल निनोचं संकट कायम

मुंबई : राज्यात १५ जूनपासून दमदार पावसाची अपेक्षा असताना मॉन्सूनने (Maharashtra Monsoon Weather Alert) पुन्हा एकदा शेतकऱ्यांची निराशा केली आहे. अरबी समुद्रातील मॉन्सूनची वाटचाल सध्या ठप्प झाली असून, अफगाणिस्तानच्या दिशेने निर्माण झालेल्या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनच्या पुढील प्रगतीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी आता २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.


यापूर्वी ११ जून, त्यानंतर १५ जून अशी मॉन्सून आगमनाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता हा अंदाज थेट २० जूनपर्यंत पुढे ढकलला गेला आहे. त्यामुळे पेरण्या रखडल्या असून शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. जलसाठ्यांची पातळीही घटत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)


दरम्यान, यंदा एल निनोचा प्रभावही राज्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याने पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय हवामान विभागानेही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत सूचना मिळेपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संभाव्य नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)



सध्या मॉन्सूनने पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या काही भागात प्रगती केली असली तरी अरबी समुद्रात गेल्या आठ दिवसांपासून कोणतीही विशेष हालचाल दिसून आलेली नाही. पुढील चार ते पाच दिवसांत मॉन्सून पुन्हा वेग घेण्याची शक्यता असून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये त्याचा प्रभाव वाढू शकतो. (Maharashtra Monsoon Weather Alert)


राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम असून नागरिक त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या सरी कोसळत असल्या तरी सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती जोरदार मॉन्सून पावसाची. आता २० जूननंतरच महाराष्ट्रात व्यापक पावसाची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत. (Maharashtra Monsoon Weather Alert)

Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Eknath Shinde : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी, ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती ठाणे : ८० व्या