Sunday, June 14, 2026

Pan Masala Sumggling: शेगावात मध्यरात्री ७० लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त

Pan Masala Sumggling: शेगावात मध्यरात्री ७० लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त

Buldhana : पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली. पोलीसांनी यात तब्बल 70 लाख 13 हजार 920 रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू आणि मालवाहू ट्रक जप्त केला. ही कारवाई शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री करण्यात आली.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

माहितीनुसार, 13 जून रोजी रात्री 10.10 वाजताच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किंता वसावे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करत होते. यावेळी वरवट बकाल रोडवरील यादव बेकरीसमोर संशयास्पदरीत्या उभा असलेला अशोक लेलँड ट्रक (MH-40-GT-2965) अडवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. शासकीय आदेशांचे उल्लंघन करून हा माल विक्री आणि वाहतुकीसाठी नेला जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले.

जप्त करण्यात आलेला मुद्दमाल

बाजीराव गोल्ड पानमसाला – 50 पोते

मस्तानी तंबाखू – 11 पोते

नजर 1000 पानमसाला – 50 पोते

N-05 प्रीमियम तंबाखू – 50 पोते

प्रीमियम नजर पानमसाला

अशोक लेलँड मालवाहू ट्रक

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत : 70,13,920 रुपये

ट्रक चालक अटकेत

या प्रकरणात पोलिसांनी सुरूर अहमद नूर अहमद (वय 37, रा. फिरदोस कॉलनी, अकोला) या ट्रक चालकाला अटक केली आहे. तसेच M/S Shree Siddheshwar Tobacco Products Pvt. Ltd. (पांढुर्णा, छिंदवाडा, मध्य प्रदेश) येथील मालक, भागीदार आणि संचालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींन विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शेगाव परिसरात अवैध पानमसाला आणि तंबाखू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >