Bhimashankar : ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे परिसराचे होणार परिवर्तन

मुंबई : भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या जागेची पाहणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली. यावेळी त्यांनी भाविकांसाठी प्रस्तावित विविध सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. भीमाशंकरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वाचा विचार करून विकास आणि संवर्धन यांचा समतोल राखत प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन होण्यास मदत होईल. तसेच ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा, भाविकांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणे आणि पर्यटन विकासाला चालना मिळून संपूर्ण परिसराचे सकारात्मक परिवर्तन घडेल, असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.



यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आरती केली. तसेच 'एल निनो' च्या संभाव्य संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी प्रार्थनाही केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,माजी आमदार अतुल बेनके तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान