Solapur Accident: पिकअप गाडी विहिरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू; परिसरात खळबळ!

सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जणांना स्थानिकांनी वाचवले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या पिकअप गाडीतील १४ जण सोलापूरच्या रांजणीगावचे स्थानिक होते. मिळालेल्या माहितीनुसार हे १४ जण देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन करून घरी परत येताना ही घटना घडली आहे.





नेमकं घडलं काय ?


हा अपघात माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ झाला. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत हा अपघात झाला.विहिरीला कठडे नव्हते. तसेच ती काठोकाठ पाण्याने भरलेली आहे. याच विहिरीत भाविकांची पिकअप गाडी कोसळली. हा अपघात नेमका कसा घडला, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण भरदिवसा ही अपघाताची घटना घडली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी ही घटना आहे. या घटनेत तब्बल ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हे १४ जण म्हसवडमधील सिद्धनाथच्या दर्शनासाठी पिकअप गाडीने गेले होते. दर्शन करून परत येताना हा अपघात झाला. यात आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने १४ पैकी सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे.





अपघाताबाबत मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया


या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. "सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे वाहन विहिरीत पडून काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींवर उपचार सुरू असून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले आहेत. तसेच मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल," असे त्यांनी म्हटले आहे.
Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Eknath Shinde : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी, ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती ठाणे : ८० व्या