Short Film : राज्य शासनाकडून बालचित्रपट निर्मितीला चालना; माहितीपट व लघुपटांसाठी अर्थसहाय्यात मोठी वाढ

मुंबई, राज्यातील दर्जेदार माहितीपट, लघुपट आणि बालचित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी माहितीपट व लघुपट निर्माण करण्यासाठी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात भरीव वाढीवची घोषणा करण्याबरोबरच; बालप्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट उपलब्ध व्हावेत या उद्देशाने राज्य शासन दरवर्षी बालचित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली.


दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्रशासकीय कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी या घोषणा केल्या.



या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते

राज्य शासनाच्या प्रचलित योजनेअंतर्गत माहितीपट व लघुपट निर्मितीसाठी आतापर्यंत प्रत्येकी १० लाख रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. या अनुदानात मोठी वाढ करून यापुढे प्रत्येक माहितीपट व लघुपटासाठी २५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले. या निर्णयामुळे दर्जेदार विषयांवरील माहितीपट आणि लघुपट निर्मितीला मोठे बळ मिळणार आहे.



याचबरोबर, बालप्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपट उपलब्ध व्हावेत या उद्देशाने राज्य शासन दरवर्षी बालचित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणाही करण्यात आली. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जात असून ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील चरित्रपट चित्रपटांसोबतच बालचित्रपट निर्मितीवर विशेष भर देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे नवोदित तसेच अनुभवी चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन मिळणार असून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्ये जपणाऱ्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती वाढण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के