एक हजार कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव ठेवला राखून
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला हातभार लावण्यासाठी मुंबई महापालिकेचा आर्थिक सहाय दिले जात असले यापूर्वी देण्यात आलेल्या अनुदानासंदर्भातील खर्चाचा हिशोब दिला जावा अशी मागणी करत स्थायी समितीने एक हजार कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव राखून ठेवला. तसेच पुढील बैठकीत स्थायी समितीच्या बैठकी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक तथा लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेने मदत दिल्यानंतरही बेस्ट आर्थिक सक्षम होण्यासाठी काय प्रयत्न करते तसेच महापालिकेने दिलेल्या पैशांचा वापर कशासाठी केला जात आहे याची उपस्थित राहून माहिती देण्याची निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले आहेत.
तरीही प्रशासनाला शंभर टक्के नाही शाश्वती तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपये खर्च करून ५० टक्केच मिळणार दिलासा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील अंधेरी सब ...
बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती आणि मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन ही मुंबई महापालिकेने सन २०२६-२७ या वर्षांसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून उपक्रमाच्या दैनंदिन कारभारासह कर्मचारी खर्च आणि प्रवासी सेवा सुरळीत ठेवण्यास मदत करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीसमोर आला होता. २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीत १२, ३१२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तरीही वाढता खर्च, प्रवासी उत्पन्नातील तूट आणि आर्थिक दायित्वांमुळे बेस्टची आर्थिक घडी अद्याप पूर्णपणे सावरलेली नाही. याबाबतच्या प्रस्तावावर बोलतांना उबाठाच्या यशोधर फणसे यांनी मागील महिन्यात दोन बेस्ट बसचे अपघात झाले असून कुर्ला आगाराचा मालमत्ता न भरल्याने याचे ९७ कोटी रुपयांचा रक्कम कापून घेत सुमारे ९०६ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे या एक हजार कोटी रुपयांची मदत बेस्टला करण्यात येत असल्याने याच्या खर्चाची माहिती मिळेपर्यंत हा प्रस्ताव राखून ठेवण्याची मागणी फणसे यांनी केली.
ब्राझील : फिफा वर्ल्ड कप २०२६ ला (FIFA World Cup 2026) ११ जूनपासून दमदार सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात मेक्सिकोने (Mexico) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) २-० असा पराभव केला, ...
तर बेस्टच्या बसेस भाड्याने घ्यायचा निर्णय कुणी घेतला असा सवाल करत शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी आपण दिलेल्या अनुदानातून भाडेतत्वावर बसेस घेण्याऐवजी मालकी तत्वावर बसेस का घेतल्या नाहीत असा सवाल केला. तर अश्रफ आझमी यांनी बेस्ट अपघातात जखमी झालेले नागरिकही मदतीसाठी बेस्टकडे प्रतिक्षित आहेत. साडेचार हजारांवर बेस्टचा ताफा हा २२४९वर आला आहे याबाबत चिंता व्यक्त केली. तर भाजपचे प्रकाश दरेकर यांनी बेस्टचे वैभव कुणामुळे खालसा होत आहे असा सवाल करत यापूर्वी काही नाही केले यापेक्षा पुढे काय करता येईल यासाठी प्रयत्न केला जावा अशी सूचना केली. तर गणेश खणकर यांनी बेस्टची किती पाच रुपये करणे कुणाचा निर्णय होता. तो निर्णय तोट्याचा असूनही पुढे चालू ठेवला. यावेळी झालेल्या चर्चेत जमीर कुरेशी, बढे, रमाकांत रहाटे आदींनी भाग घेतला. यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी आजवर १२ हजारांहून अधिक कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवण्याचा निर्णय याचकरता घेण्यात येत आहे की बेस्टला अडचणीतून बाहेर काढण्याचा सकारात्मक पाऊल उचलले जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ५ जून रोजी याबाबतची बैठक घेतली आहे, त्याचा प्रारुप काही दिवसांमध्ये समोर येईलच. त्यामुळे बेस्टचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतलेलाच आहे. त्यामुळे बेस्टचा अॅक्शन प्लान काय आहे, याची माहिती या समितीला व्हावी आणि पुढील बैठकीत त्यांच्या अधिकाऱ्यांनी येवूनही संपूर्ण माहिती द्यावी याकरता हा प्रस्ताव पुढील बैठकीपर्यंत राखून ठेवण्यात येत असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.
Krishna Lokhande June 13, 2026 08:38 AM
*मी अनुभवलेली बेस्ट* *बेस्ट आशिया खंडातील दोन क्रमांकाची आणि जगातील सर्वोत्कृष्ट आणि भारतातील एकमेव परिवहन संस्था म्हणजे मुंबईची लोकवाहिनी बेस्ट खरोखरच एक अभिमानाची आणि कर्तव्यदक्ष अशी ही बेस्ट ट्राम कंपनी कडून जेव्हा मुंबई महानगरपालिकेत हस्तांतरित झाल्यानंतर बेस्ट ने आपल्या नियोजन आणि कठोर शिस्तबद्ध* *नियोजनाच्या आधारे सत्तावीस आगारे आणि पन्नास हजार पर्यंत मराठी कामगार संख्या वाढवत नेली याचे कारण उत्कृष्ट प्रशासन त्याला राजकीय सहभाग आणि मुंबईकर जनतेने दिलेला प्रतिसाद यामुळे बेस्ट चा प्रगतीचा आलेख उंचावत गेला.* *परंतु दहा-पंधरा वर्षांपूर्वी या स्वयंपुर्ण आणि प्रगत अशा बेस्ट उपक्रमाला कुणाची तरी नजर लागली आणि चुकीच्या निर्णयामुळे म्हणजे विकेंद्रीकरणाच्या आणि खाजगीकरणाच्या राजकीय अट्टाहासापायी एक प्रगत अशी संस्था अपयशाच्या आणि दिवाळखोरीच्या मार्गावर हळूहळू काम करू लागली. मुंबईचे वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या याचा विचार करता या बेस्ट उपक्रमाचा व्याप वाढणे गरजेचे होते परंतु तसे न होता खाजगीकरणाचा चुकीचा मार्ग अवलंबल्यामुळे ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारी ही संस्था अक्षरशा प्रचंड तोटा सहन करून चालवावी लागली. त्याचा परिणाम तो तोटा भरून काढण्यासाठी महानगरपालिकेलाही आर्थिक अडचणीत आणण्याचे काम करण्यात आले. मुख्यतः आज पर्यंत बेस्ट उपक्रमाने विविध बँका किंवा सरकार यांच्याकडून कर्ज घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय लोकाभिमुख करुन नेहमीच ऊर्जितावस्थेत ठेवुनी २७ आगरे निर्माण केली आणि विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये ९५ % मराठी माणूस असल्याचा अभिमान होता परंतु खाजगीकरणाच्या नावाखाली बस भाड्याने घेण्याचा प्रकार उदयास आला आणि तेथेच खरी बेस्टच्या घसरणीला सुरुवात झाली .* *प्रवाशांना अतिशय स्वस्त, कोणताही व्यवहारीक विचार न करता दिला जाणारा दैनंदिन पास, मासिक पास, कैझीन कंपनीला दिलेले पासाचे काम यात कोणतीही सुसुत्रता नव्हती, बेस्ट प्रशासनाचा प्रशासकीय मुळ ढाच्या बदलल्याने यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने बेस्टचा तोटा आणखीन वाढत गेला, ती तुट भरुन काढण्यासाठी नविन उत्पन्न वाढविण्याऐवजी फक्त बँकाकडून कर्ज घेणे, कर्मचारी पगार कमी करणे, बस मार्ग बंद करणे असे चुकीचे मार्ग अवलंबिल्या मुळे (कारण पुर्वीचा प्रशासकीय दर्जा न राहिल्या मुळे) बेस्ट उपक्रम आणखीन गाळात रुतत गेला.* *आणि त्यात मागिल पाच वर्ष पाच ते सहा रुपये तिकीट यामुळे झालेले नुकसान कधीच भरून येणार नाही कॅनडा शेड्युल, इलेक्ट्रॉनिक फलक, चलो ऍप अशी विविध कंत्राटी लोकांना पोसणाऱ्या योजना यामुळे तोटा वाढत गेला.* *प्रामुख्याने बसगाड्या भाड्याने घेऊन त्यांना देणार देण्यात येणारे भाडे आणि त्यांच्या कडून मिळणारे दैनिक उत्पन्न याची तफावत बघितली तर जगातील असा कोणता धंदा आहे की तो तोट्यात चालू ठेवु शकतो आणि हे करत असताना प्रशासनातही योग्य निर्णय घेण्याची क्षमता किंवा राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या विचारा धारेला विरोध करण्याचे धाडस प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याला करावसंच वाटलं नाही.* *आवक आणि जावक यातील फरकामुळे हा बेस्ट उपक्रम आणखीन तोट्यात जाऊ शकतो याचे साध गणित यांना समजू शकलं नाही का . यावर यांची चुकीचे उपाययोजना म्हणजे कामगार कपात, जागा भाड्याने देणे आणि बस भाड्याने घेणे हेच चुकीचे निर्णय राबवण्यात आले पर्यायने बेस्ट उपक्रम एक मराठी माणसांची संस्था आणखीनच मरणाच्या* *खाईत लोटली गेली आणि अशीच चुकीची ध्येय धोरणे राबवत गेली तर प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही बेस्ट उपक्रम चालवणं अशक्य आहे.* *यातून या बेस्ट उपक्रमाला आणि मुंबई महानगरपालिकेला भविष्यातील तोटा अधिक सहन करावा लागु शकतो. हे चुकीचे मार्ग न अवलंबता स्वतःचेच बसगाड्या असणे आणि ते ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवून बेस्ट उपक्रमाला* *वाचविण्याशिवाय पर्याय नाही . मुंबईतील मराठी माणसाला स्थिर स्थावर करण्यासाठी योग्य ते पाऊले उचलणे गरजेचे आहे कारण राज्य सरकार किंवा महानगरपालिका यांनी एकदाच मोठा अनुदान रुपी फंड बेस्टला देऊन स्वतःच्या स्वमालकीच्या बसगाड्या घेण्यासाठी आणि निवृत कर्मचाऱ्यांना त्यांची देणी देण्यासाठी उपलब्ध करून द्यावा* *त्यातून ना नफा ना तोटा या तिकीट* *विक्रीवर ही संस्था चालू ठेवावी अन्यथा वरील चुकीचे निर्णय घेण्यात आले तर दरवर्षी मुंबई* *महानगरपालिकेला बेस्ट उपक्रमाला पूर्णपणे* *अर्थसहाय्य केल्याशिवाय बेस्ट उपक्रम चालणे अवघड आहे.* *बेस्ट उपक्रमाविषयी असलेला अभिमान आणि अस्मिता त्यातून निर्माण झालेला हा पत्र प्रपंच.*