Ind vs Afg : गुरबाजचे वादळी शतक, तरीही अफगाणिस्तान 194 धावांत गारद; कोणी घेतल्या जास्त विकेट्स ?

धर्मशाला : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात धर्मशाळा येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानचा डाव 24.5 षटकांत 194 धावांवर आटोपला. पावसामुळे 25 षटकांच्या करण्यात आलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानकडून रहमानुल्ला गुरबाजने 102 धावांची वादळी खेळी केली. मात्र त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही . यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.



गुरबाजचे वादळी शतक


अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. पदार्पण करणाऱ्या गुरनूर ब्रारने इब्राहिम झद्रानला अवघ्या 1 धावेवर बाद केले. त्यानंतर अर्शदीप सिंगने अतल (0) आणि रहमत शाह (3) यांना माघारी धाडत अफगाणिस्तानची अवस्था 3 बाद अशी केली. मात्र यानंतर रहमानुल्ला गुरबाजने एकहाती लढा दिली. त्याने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत केवळ 51 चेंडूत 102 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता.गुरबाजच्या आक्रमक फलंदाजीमुळे अफगाणिस्तान मजबूत स्थितीत दिसत होता. मात्र भारताने निर्णायक क्षणी सामन्यावर पकड मिळवली. नितीश कुमार रेड्डीने 16व्या षटकात गुरबाजला बाद करत भारताला मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्यानंतर हर्ष दुबेने अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (27) याला बाद केले. या दोन विकेट्सनंतर अफगाणिस्तानची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. शेवटच्या 10 षटकांत त्यांनी केवळ 58 धावा करत 7 विकेट्स गमावल्या.



गुरनूर ब्रारची शानदार सुरुवात


भारताकडून पदार्पण करणाऱ्या गुरनूर ब्रारने 4.5 षटकांत 27 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याला अर्शदीप, नितीश कुमार रेड्डी आणि हर्ष दुबे यांनी चांगली साथ दिली. यामुळे भारताला आफगाणिस्तानला १९४ वर ऑल आउट करण्यात यश आले.



भारतासमोर 195 धावांचे लक्ष्य


पावसामुळे 25 षटकांच्या करण्यात आलेल्या सामन्यात भारताला विजयासाठी 195 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. कर्णधार शुभमन गिल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या फलंदाजीवर आता सर्वांच्या नजरा असतील.

Comments
Add Comment

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची