Gold smuggling : अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई; इंडिगो विमानातून 4.26 कोटींचे सोने जप्त !

गुजरात : गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय (SVPI) विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल 4.26 कोटी रुपयांचे विदेशी सोने जप्त करण्यात आले आहे. दुबईहून अहमदाबाद येथे आलेल्या इंडिगोच्या 6E-1478 या विमानात हे सोने चतुराईने लपवले होते.





सीमाशुल्क (कस्टम्स) अधिकार्‍यांनी शनिवार 13 जून 2026 रोजी विमानाची सखोल तपासणी केली. यावेळी विमानातील सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने विमानाच्या पुढील शौचालयातील स्पीकर बॉक्सची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये काळ्या प्लास्टिक टेपने गुंडाळलेले दोन संशयास्पद पाऊच आढळून आले. या पाऊचची तपासणी केली असता त्यामध्ये 999.0 शुद्धतेची (24 कॅरेट) एकूण 24 विदेशी सोन्याची बिस्किटे सापडली. या सोन्याचे एकूण वजन 2,799.3 ग्रॅम असून त्याचे बाजारमूल्य चार कोटी 26 लाख 89 हजार 325 रुपये इतके असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमाशुल्क विभागाच्या प्राथमिक तपासणीत हे सोने भारतात बेकायदेशीररीत्या आणण्याच्या उद्देशाने विमानात लपवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या सोन्यावर मालकी हक्क सांगण्यासाठी कोणतीही व्यक्ती पुढे आली नाही. त्यामुळे सीमाशुल्क कायदा 1962 अंतर्गत संबंधित नियमांनुसार, सर्व सोने जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून तस्करीमागील व्यक्ती किंवा रॅकेटचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाने दिली. सीमाशुल्क विभागाने या कारवाईचा व्हिडीओही प्रसिद्ध केला असून, विमानतळांमार्फत होणाऱ्या सोन्याच्या तस्करीवर लक्ष ठेवण्यासाठी तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

Narayan Rane : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

सिंधुदुर्गात ४६ कोटींचे 'सबमरीन टुरिझम' प्रोजेक्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार खासदार नारायण राणे यांचा

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या