Gold Silver Rate: सराफा बाजारात काही दिवसांच्या घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या किमतींनी पुन्हा उसळी घेतली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली असून, जागतिक बाजारातील चढ-उतार आणि वाढलेल्या गुंतवणूक मागणीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे. (Gold Silver Rate)
आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹1,49,080 वर पोहोचला आहे. शुक्रवारीच्या तुलनेत यात ₹500 ची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,36,650 प्रति तोळा झाला असून त्यात ₹450 ची वाढ नोंदवली गेली आहे.
Nashik : नाशिकमध्ये बीएसएनएल केबल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश, २ कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त
नाशिक : शहरात बीएसएनएल (BSNL) कंपनीच्या महागड्या भूमिगत तांब्याच्या (यू.जी. केबल) चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक, गुंडा पथक व अंबड गुन्हे ...
आजचे सोन्याचे दर
24 कॅरेट सोने: ₹14,908 प्रति ग्रॅम (+₹50)
22 कॅरेट सोने: ₹13,665 प्रति ग्रॅम (+₹45)
18 कॅरेट सोने: ₹11,181 प्रति ग्रॅम (+₹37)
चांदीचाही दर वाढला
सोनेप्रमाणेच चांदीच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे. आज चांदीचा दर प्रति ग्रॅम ₹260.10 इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव सुमारे ₹2.60 लाखांवर पोहोचला आहे.
Standup Comedian Pranit More Apology : ‘ती माझी सर्वात मोठी चूक होती’; 370 Biryani प्रकरणावर प्रणित मोरेचे स्पष्टीकरण
मुंबई : 370 Biryani वाद (Controversy) आणि महाराष्ट्र सायबर (Maharashtra Cyber) गुन्हा दाखल प्रकरणानंतर स्टँडअप कॉमेडियन (Stand-up Comedian) प्रणित मोरे (Pranit More) पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या ...
का वाढत आहेत दर?
आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता, डॉलरमधील चढ-उतार आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढलेला कल यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींना पुन्हा आधार मिळाला आहे. तसेच जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणावामुळेही गुंतवणूकदार सोने आणि चांदीकडे वळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि गुजरातसह देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली असून, आगामी काळात जागतिक घडामोडींवर या किमतींची दिशा अवलंबून राहणार आहे.