EL Nino : 'अल निनो'मुळे दुष्काळाचा धोका ? पाणी जपून वापरण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्‍याची शक्‍यता असून, पर्जन्‍यमानात घट होण्‍याची शक्‍यताही वर्तविली आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर राज्‍यातील विविध धरणं, जलाशय आणि जलस्‍त्रोतांमध्‍ये उपलब्‍ध असलेला पाणीसाठा संरक्षित करुन, सुरु असलेली पाण्‍याची आवर्तन तात्‍काळ बंद करण्‍याचे निर्देश जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डौले यांनी सर्व विभागीय आयुक्‍त आणि जिल्‍हाधिका-यांना दिले आहेत.


या संदर्भात शासनाने काढलेल्‍या परिपत्रकात सर्व जिल्‍हाधिकारी व संबधित जलसंपदा विभागाच्‍या आधिका-यांनी आपल्‍या कार्यक्षेत्रातील धरणं व जलाशयांमधील उपलब्‍ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्‍यावा. अत्‍यावश्‍यक परिस्थिती वगळता पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी राखीव ठेवण्‍यात आलेल्‍या पाण्‍याचा वापर इतर कोणत्‍याही कारणांसाठी करु नये. दिनांक ३१ ऑगस्‍ट पर्यंत सर्व शहरी व ग्रामीण भागात अखंडीत पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा होईल यासाठी धरणांमध्‍ये आरक्षित करण्‍यात आलेला पाणीसाठा जपून वापरण्‍याबाबतही जिल्‍हास्‍तरावर कृती आराखडा तयार करण्‍याच्‍या सुचना प्रधान सचिवांनी दिल्‍या आहेत.


स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, पाणी पुरवठा विभाग यांच्‍यात प्रभावी समन्‍वय ठेवून परिस्थितीचा नियमित आढावा घेण्‍याबाबत तसेच धरणं, कालवे, नद्या, तलाव व इतर जलस्‍त्रोतांमधून होणारा अनाधिकृत व बेकायदेशिर पाणी उपसा तात्‍काळ थांबविण्‍यासाठी विशेष मोहीम राबविण्‍याचे निर्देशही शासनाने काढलेल्‍या परिपत्रात देण्‍यात आले आहेत. यासाठी महसूल, पोलिस व जलसंपदा विभागाच्‍या आधिका-यांच्‍या संयुक्‍त पथकांमार्फत अनधिकृत मोटारी, पाईपलाईन, पंप व इतर सामुग्रींची तपासणी करण्‍याकरीता गस्‍त आयोजित करावी व वेळप्रसंगी दिनांक १२ डिसेंबर २०१८ रोजी काढण्‍यात आलेल्‍या शासन निर्णयाप्रमाणे कारवाईच्‍या कडक सुचनाही शासनाने परिपत्राकत दिल्‍या आहेत.पाणीसाठा, पिण्‍याच्‍या पाण्‍याची उपलब्‍धता, सिंचन आवर्तने स्‍थगित करण्‍याबाबतची कार्यवाही व बेकायदेशिर पाणी उपसा रोखण्‍यासाठी करण्‍यात आलेल्‍या कार्यवाहीचा सविस्‍तर अहवाल प्रत्‍येक आठवड्याला सादर करण्‍याच्‍या सुचना विभागीय आयुक्त, सर्व पाटबंधारे विकास महामंडळ, जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या आधिका-यांना देण्‍यात आल्‍या आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता