Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी पुणे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण आढावा बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत पांडुरंगाच्या वारीच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर वारी मार्गावरील पाणी, वीज, स्वच्छता, विसावा केंद्रे, आरोग्य सुविधा, मदत केंद्रे, दिशादर्शक फलक तसेच (NHAI) ची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिल्या.



मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी वारी-२०२६ च्या नियोजनाबाबत आढावा बैठक पुणे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला पालखी सोहळा विश्वस्त, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.





आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते, मुक्काम स्थळं आणि विसावा स्थळांची दुरुस्ती, आवश्यकतेनुसार टँकर व्यवस्था, जर्मन हँगर, पाणीपुरवठा तसेच वैद्यकीय सुविधा, आरोग्य मनुष्यबळ, मेडिकल किट आणि NDRF-SDRF पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.



'स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी' हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्याबाबत त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा उपाय, वाहतूक व्यवस्थापन आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त याबाबतही आवश्यक त्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.





पालखी सोहळा विश्वस्त, दिंडी प्रमुख आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयाने काम करून वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश यावेळी दिले. सदर बैठकीत प्राप्त झालेल्या सर्व सूचनांची नोंद घेऊन त्यानुसार आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे चौकशीचे आदेश

- हल्लेखोराला तातडीने अटक; मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस मुंबई : शिरोमणी अकाली

Chandrashekhar Bawankule : भूसंपादन प्रक्रियेत हिस्सानिहाय संयुक्त मोजणीसाठी नवी कार्यपद्धती

- महसूलमंत्र्यांचा निर्णय; नुकसानभरपाई वितरणातील अडचणी आणि सहधारकांमधील वाद कमी होणार मुंबई : सार्वजनिक

Sukhbir Singh Badal Attack : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर

Kalpana Kharat : भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात अखेर शिर्डी पोलिस ठाण्यात हजर

Kalpana Kharat : मोठी बातमी समोर आली आहे. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातने अखेर शिर्डी पोलिस ठाण्यात (Shirdi Police Station) हजेरी

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड