Gold and Silver : सोनं-चांदी होणार स्वस्त ? सरकारचा मोठा निर्णय; आयात शुल्कात बदलामुळे दरांवर काय परिणाम ?

Gold and Silver : सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने आज म्हणजेच १२ जून २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या आयात मूल्यामध्ये मोठा बदल करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने सोन्याची ‘बेस इम्पोर्ट प्राईज’ म्हणजेच पायाभूत आयात मूल्य कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोनं खरंच स्वस्त होणार का? असा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.



‘बेस इम्पोर्ट प्राईज’ झाले कमी


गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना परकीय चलन वाचवण्यासाठी सोनं खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र अशातच सरकारने सोन्याची ‘बेस इम्पोर्ट प्राईज’ म्हणजेच पायाभूत आयात मूल्य कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या नव्या आदेशानुसार, सोन्याची बेस इम्पोर्ट प्राईज प्रति १० ग्रॅम ८० डॉलरने घटवून १,३४३ डॉलर करण्यात आली आहे. तर चांदीची बेस इम्पोर्ट प्राईज प्रति किलो २७६ डॉलरने कमी करून २,०९२ डॉलर करण्यात आली आहे.



‘Base Import Price’ म्हणजे काय?


सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, हा सरकारने ठरवलेला "टॅक्स आकारणीचा दर" असतो. म्हणजेच परदेशातून भारतात येणाऱ्या सोन्या-चांदीवर किती कस्टम ड्युटी आकारायची, यासाठी सरकारने ठरवलेला संदर्भ दर म्हणजे बेस इम्पोर्ट प्राईज. हा बाजारातील प्रत्यक्ष सोन्याचा भाव नसून, फक्त कर आकारणीसाठी वापरला जाणारा सरकारी दर असतो.सरकारने ही व्यवस्था ठेवली नाही, तर अनेक आयातदार सोन्याची खरी किंमत लपवून (कमी दाखवून) कर चुकवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे हे गरजेचे आहे.


हे दर ठरवण्याची जबाबदारी CBIC अर्थात Central Board of Indirect Taxes and Customs कडे असते. ‘कस्टम्स ॲक्ट १९६२’ अंतर्गत अधिसूचना जारी करून हे दर निश्चित केले जातात. यावेळीही ११ जून २०२६ रोजी CBIC ने अधिसूचना क्रमांक 54/2026-Customs (N.T.) जारी करून नवीन दर घोषित केले आहे. या अधिसूचनेनुसार नवीन दर लागू करण्यात आले असून ते १२ जूनपासून प्रभावी झाले आहेत.



सरकार ही किंमत कशी ठरवते ?


सरकार हे दर ठरवताना आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीचे भाव, डॉलरच्या तुलनेत रुपयाची चालू स्थिती, आयातीचा कल, तसेच तस्करी आणि करचुकवेगिरी रोखण्याच्या गरजा लक्षात घेत असते.



सोने चांदीची बेस इम्पोर्ट प्राईज आता किती ?


सोन्याची बेस इम्पोर्ट प्राईज कमी करून १,३४३ डॉलर प्रति १० ग्रॅम केली आहे तर चांदीची बेस इम्पोर्ट प्राईज कमी करून २,०९२ डॉलर प्रति किलोग्राम केली आहे.याचा थेट अर्थ असा आहे की, आता आयात केलेल्या सोन्या-चांदीवर लागणाऱ्या कस्टम ड्युटीची गणना आधीच्या तुलनेत कमी मूल्यावर होईल. म्हणजेच बेस इम्पोर्ट प्राईज कमी तर कराचे मूल्य कमी आणि कराचे मूल्य कमी तर आयात खर्च कमी.



सोनं स्वस्त होणार का ?


आता महत्त्वाचा प्रश्न यामुळे सोनं स्वस्त होणार का ? तर उत्तर आहे, लगेच तर नाही. सरकारने बेस इम्पोर्ट प्राईज कमी केल्याचा पहिला फायदा आयातदार आणि मोठ्या ज्वेलर्सना मिळतो, कारण त्यांचा आयात खर्च काही प्रमाणात कमी होतो. बेस इम्पोर्ट प्राईज कमी झाल्यामुळे आयातदार आणि मोठ्या ज्वेलर्सचा खर्च काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मात्र ज्वेलरी दुकानातील अंतिम सोन्याचा दर हा स्थानिक मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि सराफा बाजारातील बदलांवरही अवलंबून असतो.


म्हणजेच, सरकारच्या या निर्णयामुळे सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता असली तरी ग्राहकांना तात्काळ मोठा दिलासा मिळेलच, असे निश्चितपणे सांगता येत नाही.

Comments
Add Comment

Mumbai Local Delay : पावसामुळे मुंबईकरांची धावपळ वाढली! मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल उशिराने

मुंबई : मुंबई, नवी मुंबई आणि रायगड परिसरात गुरुवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा (Heavy Rain) जोर शुक्रवारीही कायम

Mumbai Rain : मुंबईत पाऊस सुरूच! सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार, ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई : मुंबईत (Mumbai) सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह

Co-operation Minister Babasaheb Patil : राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाला मध्यवर्ती संस्थेचा दर्जा; गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई : राज्यातील गृहनिर्माण संस्थांच्या (Housing Societies) विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, राज्य सहकारी

Manhole Death : अमरापूरकर यांच्या मृत्यूनंतरही मॅनहोल्समध्ये पडून अनेकांचा मृत्यू

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील कुर्ला खैरानी रोडवरील मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर

waterborne diseases : पावसाळा कालावधीतील जलजन्य आजारांच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : संपूर्ण पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईकरांना सुदृढ आणि निरोगी आरोग्य सेवा देण्यासाठी

Mayor Ritu Tawde : नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, महापौरांचा कठोर इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : साकीनाका येथील खैरानी मार्गावर खुल्या मॅनहोलमध्ये पडून असलम इसाक शेख (वय ५५ वर्षे) यांचा