IRCTC : वाट कसली बघताय बॅगा भरा, आयआरसीटीसीकडून 'दिव्य दक्षिण यात्रा', भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC : भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड (IRCTC), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेल्या नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने आपल्या विशेषरित्या नियोजित “दिव्य दक्षिण यात्रा” या तीर्थयात्रेची घोषणा केली आहे. ही यात्रा भारत गौरव पर्यटक रेल्वेद्वारे आयोजित करण्यात येणार असून रेल्वे 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून प्रस्थान करेल.



10 रात्री आणि 11 दिवस मनमुराद फिरा


आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणे आणि भाविकांना सुलभ व सर्वसमावेशक तीर्थयात्रेचा अनुभव देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 10 रात्री आणि 11 दिवसांच्या या यात्रेत दक्षिण भारतातील प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक स्थळांना भेट दिली जाईल. यामध्ये हम्पी, म्हैसूर, कोयंबतूर, तिरुवन्नामलाई, वेल्लोर, तिरुपती आणि मल्लिकार्जुन या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.


भारत गौरव पर्यटक रेल्वेमध्ये प्रवाशांच्या विविध गरजा लक्षात घेऊन इकॉनॉमी स्लीपर (SL), स्टँडर्ड 3AC आणि कम्फर्ट 2AC या श्रेणींमध्ये प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुमारे 750 प्रवाशांची क्षमता असलेल्या या रेल्वेसाठी मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पुणे आणि मिरज या स्थानकांवर चढणे व उतरणे याची सुविधा उपलब्ध असेल, ज्यामुळे महाराष्ट्रातील भाविकांना प्रवास अधिक सोयीस्कर होईल.


श्री गौरव झा, समूह महाव्यवस्थापक, आयआरसीटीसी पश्चिम विभाग, मुंबई यांनी सांगितले की, हा सर्वसमावेशक पर्यटन पॅकेज प्रवाशांना आरामदायी आणि त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव देण्यासाठी विशेषतः तयार करण्यात आला आहे.



या पॅकेजमध्ये खालील सुविधांचा समावेश


रेल्वे प्रवास


सामायिक तत्त्वावर हॉटेलमध्ये निवास व्यवस्था


संपूर्ण प्रवासादरम्यान शुद्ध शाकाहारी भोजन


स्थानिक पर्यटन आणि रस्तेमार्गे वाहतूक


प्रवास विमा


अनुभवी आयआरसीटीसी टूर मॅनेजरांची सेवा



पॅकेजचे दर पुढीलप्रमाणे


इकॉनॉमी स्लीपर (SL) – ₹19,770 प्रति व्यक्ती


स्टँडर्ड 3AC – ₹33,370 प्रति व्यक्ती


कम्फर्ट 2AC – ₹44,250 प्रति व्यक्ती



प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आयआरसीटीसी ने आवश्यक आरोग्य व सुरक्षा उपाययोजना सुनिश्चित केल्या आहेत, ज्यामुळे सर्व प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.


“दिव्य दक्षिण यात्रा” ही यात्रा दक्षिण भारताच्या समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या भाविक, कुटुंबे आणि पर्यटनप्रेमींना आकर्षित करेल, अशी अपेक्षा आहे. तसेच, देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि थीम-आधारित रेल्वे पर्यटनाद्वारे प्रादेशिक संपर्क अधिक मजबूत करणे या आयआरसीटीसी च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांशीही हा उपक्रम सुसंगत आहे.



यात्रेसाठी नोंदणी आणि बुकिंग आयआरसीटीसीच्या पर्यटन प्लॅटफॉर्मवर सुरू 


माध्यम संपर्क


आयआरसीटीसी – भारत गौरव पर्यटक रेल्वे कक्ष, मुंबई


मोबाईल: 8287931886


ई-मेल: bgtmumbai@irctc.com

Comments
Add Comment

Nilesh Rane : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील कोकण वासियांसाठी १२ सप्टेंबरला दादर ते कुडाळ मोफत विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था

आमदार निलेश राणे यांचा सालाबाद प्रमाणे उपक्रम मालवण : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या

Dhule : जंगलात आढळले तरुण-तरुणीचे मृतदेह, धुळ्यात नेमकं काय घडलं ?

Dhule : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम

Anna Bansode : अनधिकृत बांधकामाबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (KUADA) कार्यक्षेत्रातील विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर

Sukhbir Singh Badal Attack : धक्कादायक! नांदेडमध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; सुरक्षा कर्मचारीही जखमी

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे  (Shiromani Akali Dal) राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यू; महिन्याभरात पत्नीसोबत घडला असा प्रकार...

पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत (Pune Moshi) पतीचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरात 23 वर्षीय पत्नीने गळफास

Crime News : धुळे जिल्हा परिषदेचा फिटर खासगी एजंटसह जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Crime News : जळगाव एसीबीकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्यासह