Jalgaon News : अनधिकृत विक्रेत्यांचे धाबे दणाणले; 305 जण रंगेहात ताब्यात

Jalgaon News : रेल्वे प्रवास करताना रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्रेते (Food vendors) येत असतात. यातील बऱ्याच जणांकडे परवाना नसतो. अशावेळेस अनेकदा हे अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते (Unauthorized food vendors) प्रवाशांच्या आरोग्याशी खेळतात. याच विनापरवाना घुसखोरी करणाऱ्या अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.


भुसावळ रेल्वे विभागाच्या (Bhusawal Railway Division) वाणिज्य शाखा आणि रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) संयुक्त 'सर्जिकल स्ट्राईक' करत तब्बल ३०५ अनधिकृत विक्रेत्यांना रंगेहात पकडले आहे. गेल्या १५ दिवसांपासून ही कारवाई सुरु आहे. या धडक मोहिमेमुळे रेल्वे स्थानक आणि गाड्यांमधील अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६७ जणांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल ९७ हजार ९५० रुपये दंड वसुलण्यात आला आहे.




तीन रेल्वे मार्गांवर 'क्लीन स्वीप'


भुसावळ रेल्वे प्रशासनाने (Bhusawal Railway Administration) दिलेल्या माहितीनुसार, २८ मे ते १० जून या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रवाशांच्या आरोग्याशी होणारा खेळ लक्षात घेता त्यासोबतच प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे हा यामागचा मुख्य हेतू होता. या मोहिमेत मुख्यत्वे तीन रेल्वे कॉरिडोअर्सवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. यामध्ये भुसावळ – खंडवा विभाग (Bhusawal – Khandwa Section), भुसावळ – नाशिक विभाग (Bhusawal – Nashik Division), भुसावळ – बडनेरा विभाग (Bhusawal – Badnera Section)  या मार्गांवर धावणाऱ्या एक्स्प्रेस आणि प्रमुख स्थानकांवर आरपीएफच्या जवानांनी आणि वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या अनधिकृत विक्रेत्यांची धरपकड केली.




'१३९' वर करा थेट तक्रार


प्रवाशांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत केवळ अधिकृत आणि परवानाधारक स्टॉल्स किंवा विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थांची खरेदी करावी. प्रवासात कुठेही खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यास किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास तात्काळ रेल्वेच्या १३९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा 'रेलमदद' पोर्टलवर तक्रार नोंदवावी. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


दरम्यान, रेल्वे प्रवाशांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असून, अशी कारवाई भविष्यातही आणखी तीव्रतेने सुरूच राहील, असा थेट इशारा भुसावळ रेल्वे प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे अनधिकृत विक्रेत्यांना मोठा झटका बसला आहे.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी