मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानेच परिवर्तन पॅनलची स्थापना : कपिल पाटील

मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानेच


खोडसाळपणे आरोप करण्यापेक्षा रवींद्र चव्हाणांबरोबर थेट चर्चा करा


मुरबाड : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्या परिवर्तन पॅनलची स्थापना ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, वन मंत्री गणेश नाईक आणि सर्व वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानेच झाली. परिवर्तन पॅनलची घोषणा झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ऑनलाईन बैठक घेऊन भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्यानंतरही, मतदारांना संभ्रमात टाकण्याचा प्रकार सुरू आहे. आरोप करणाऱ्यांच्या पायाखालील वाळू सरकली असून, खोडसाळपणे आरोप करण्यापेक्षा ज्या कोणाला परिवर्तन पॅनलबाबत शंका आहे, त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर चर्चा करावी, अशी सूचना माजी केंद्रीय राज्यमंत्री व परिवर्तन पॅनलचे प्रमुख कपिल पाटील यांनी केली आहे.



ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी विश्वासात न घेता परिवर्तन पॅनलचे उमेदवार जाहीर केल्याचा आरोप बँकेच्या एका नवनिर्वाचित संचालकाने केला होता. त्यासंदर्भात मुरबाड येथे पत्रकारांनी विचारणा केल्यावर कपिल पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वन मंत्री गणेश नाईक यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर परिवर्तन पॅनलची घोषणा करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट भाजप कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही काही जणांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप-शिवसेना महायुतीचे परिवर्तन पॅनल अधिकृत असून, त्याला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री गणेश नाईक यांचा पाठिंबा आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पॅनलबरोबर राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केल्याचे शिवसेनेकडून पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले.


परिवर्तन पॅनलची घोषणा होण्यापूर्वीच, एका नेत्याच्या कार्यालयातून गेल्या १५ दिवसांपासून फोन करून भाजपचा उमेदवार व पॅनल असल्याचे सांगितले जात असल्याकडे कपिल पाटील यांनी लक्ष वेधले.त्यांचे कार्यक्रमातून मतदारांना फोन जात होते, भाजपच्या पॅनलला मतदान करा, असे त्यांच्या नावाने आवाहन करण्यात येते होते, त्यांनी भाजपचा उमेदवार कोणाला विश्वासात घेऊन जाहीर केला आणि त्यांना भाजपाचे पॅनल ठरवण्याचा विशेष अधिकार प्राप्त आहे का, असाही प्रश्न कपिल पाटील यांनी उपस्थित केला. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकही जागा न घेता वसई विकाससोबत युती ह्याच व्यक्तीने केली होती. त्या वेळेला पक्षाच्या नेत्यांना असे सांगितले गेले की वसई विकास पक्षाने भाजपला ८ जागा सोडत आहेत. सेवा संस्थेच्या ८ मतदारसंघात वसई विकासची काहीही ताकद नव्हती, त्या जागा सोडण्याचा प्रश्नच येत नव्हता, अशी युती करून दिशाभूल करण्यात आली. तर आता ७ पैकी अवघी १ जागा घेऊन भाजपला इतर पक्षाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी खंत कपिल पाटील यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष स्तरावर प्रदेशाध्यक्षांपेक्षा कोणीही मोठा नाही. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मान्यता दिलेले पॅनल अधिकृत की एका व्यक्तीने जाहीर केलेले पॅनल अधिकृत याचा विचार पत्रकारांनी करावा, अशी सूचना कपिल पाटील यांनी केली.



भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेवरून परिवर्तन पॅनल प्रमुख म्हणून काम पाहत आहे. तर पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आग्रहामुळे भिवंडीतून संचालक म्हणून उमेदवारी अर्ज भरला, असे कपिल पाटील यांनी सांगितले.बँकेच्या निवडणुकीत आपण पोस्टमन म्हणून काम करीत आहोत. मात्र, काही जण आधी स्वत, मग देश आणि काही वाचले तर पार्टी म्हणून काम करीत आहेत, असा टोला कपिल पाटील यांनी मारला.भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन खोडसाळपणाने बातम्या देण्याऐवजी स्वत: समोर येऊन पत्रकारांसमोर चर्चा करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान कपिल पाटील यांनी दिले.बँकेचे ठाणे जिल्ह्यात २४००, तर पालघर जिल्ह्यात १६०० मतदार आहेत. मात्र, सहकार पॅनलमध्ये केवळ ठाणे जिल्ह्यासाठी १ जागा घेण्यात आली. तर पालघर जिल्ह्याला ६ जागा देण्यात आल्या. २४०० मतदारांसाठी केवळ एक जागा घेऊन वैयक्तिक स्वार्थापोटी भाजपला इतर पक्षांच्या दावणीत बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सहकार पॅनलचा उद्देश मतदारांच्या लक्षात आला असून, ठाणे जिल्हा बँकेचे मतदार परिवर्तन पॅनलच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास कपिल पाटील यांनी यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Shirdi : साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंवरून दिल्ली हायकोर्टाचे कडक निर्देश

Shirdi : शिर्डीतील साईबाबा आणि साईबाबा संस्थानविरोधात सोशल मीडिया आणि यूट्यूबवर प्रसारित होणाऱ्या बदनामीकारक तसेच

Sukhbir Singh Badal Attack : धक्कादायक! नांदेडमध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; सुरक्षा कर्मचारीही जखमी

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे  (Shiromani Akali Dal) राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यू; महिन्याभरात पत्नीसोबत घडला असा प्रकार...

पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत (Pune Moshi) पतीचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरात 23 वर्षीय पत्नीने गळफास

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रगीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या

Crime News : धुळे जिल्हा परिषदेचा फिटर खासगी एजंटसह जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Crime News : जळगाव एसीबीकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्यासह