Satana : कपडे वाळत टाकताना भयानक घडलं, आईचा मृत्यू तर १० वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला

Satana : सटाणा शहरातील अहिल्यादेवी चौक परिसरातील आसरा माता मंदिरासमोरील अहिल्यानगर भागात गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कपडे वाळत टाकत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे राहणाऱ्या सोनाली अरविंद सोनवणे या आपल्या घराच्या बाहेर गच्चीवर कपडे वाळत टाकत होत्या. यावेळी परिसरातील विजेच्या खांबावरून आलेली केबल गच्चीच्या रेलिंगला बांधलेली होती. दरम्यान, ही वायर अचानक तुटून रेलिंगच्या संपर्कात आली आणि त्यामुळे रेलिंगमध्ये विद्युत प्रवाह निर्माण झाला.


कपडे वाळत टाकत असताना सोनाली सोनवणे यांचा हात त्या रेलिंगला लागला आणि त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.



१० वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला


या अचानक घडलेल्या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी त्यांचा दहा वर्षांचा मुलगा त्यांच्या जवळच उपस्थित होता. सुदैवाने तो या दुर्घटनेतून थोडक्यात बचावला असल्याचे सांगण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विजेच्या तारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.


स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत अशा धोकादायक केबल्सची तातडीने तपासणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून नेमकी दुर्घटना कशामुळे घडली याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : मिशन मोडवर १०० दिवसांचे आरोग्य अभियान राबवावे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानातून मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाचे होणार निदान मुंबई : राज्यातील

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड

Mangalagauri Traditional Jewellery : यावर्षी मंगळागौरीच्या शृंगारात हे पारंपरिक दागिने नक्की ट्राय करा; लूकला मिळेल खास मराठमोळा टच!

मुंबई : मंगळागौर म्हटलं की पारंपरिक पूजा, उत्साह, फुगड्या आणि नटलेल्या-सजलेल्या महिलांची लगबग डोळ्यांसमोर येते.

Crime News : धुळे जिल्हा परिषदेचा फिटर खासगी एजंटसह जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Crime News : जळगाव एसीबीकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्यासह

Independence Day Special : OTT वर पाहा 'हे' 6 देशभक्तीपर सिनेमे; अंगावर येईल काटा!

1. भारत भाग्य विधाता – ZEE5 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट कामा हॉस्पिटलमधील

CJP : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे