Global Chess League 2026 : भारतात पुन्हा रंगणार बुद्धिबळाचा थरार; बेंगळुरूमध्ये होणार चौथा हंगाम; तीन स्पेंटबरपासून ग्लोबल चेस स्पर्धेला सुरुवात

मुंबई : जागतिक बुद्धिबळविश्वासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ग्लोबल चेस लीग (GCL) 2026 चा चौथा हंगाम भारतातच आयोजित केला जाणार आहे. २०२६ च्या लीगचा यजमानपद बेंगळुरु शहराकडे सोपवण्यात आले आहे. ही स्पर्धा 3 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा आयोजकांनी केली आहे. विशेष म्हणजे, गेल्य वर्षी या हंगामाचा तीसरा सीजन मुंबईमध्ये यशस्वीपणे पार पडला होता . त्याआधी 2023 मध्ये दुबई आणि 2024 मध्ये लंडन येथे या प्रतिष्ठित लीगचे आयोजन करण्यात आले होते. सलग दुसऱ्या वर्षी भारतात स्पर्धा होत असल्याने भारतीय बुद्धिबळप्रेमींमध्ये उत्साहचे वातावरण आहे.

">(Vaibhav sooryvanshi)



जगातील दिग्गज खेळाडू पुन्हा आमनेसामने


टेक महिंद्रा आणि FIDE (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या लीगमध्ये जगातील आघाडीचे बुद्धिबळपटू संघात्मक स्वरूपात खेळताना दिसतील. फ्रँचायझी आधारित स्पर्धा, महिला-पुरुष मिश्र संघ आणि जलदगती सामने ही या लीगची खास वैशिष्ट्य मानला जात आहे. ग्लोबल चेस लीगचे आयुक्त गौरव रक्षित यांनी सांगितले की, बेंगळुरूमध्ये लीगचे आयोजन होणे हा बुद्धिबळाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. भारत सध्या जागतिक बुद्धिबळ चळवळीच्या केंद्रस्थानी असून, या प्रवासातील नवे पर्व बेंगळुरूमधून सुरू होणार आहे. मागील हंगामांमध्ये भारताचे युवा ग्रँडमास्टर्स डी. गुकेश, आर. प्रज्ञानानंदा तसेच दिग्गज विश्वनाथन आनंद यांनी सहभाग नोंदवला होता. यंदाही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. मात्र, चौथ्या हंगामातील संघ आणि अंतिम स्थळाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.



चाहत्यांसाठी सूर्वण संधी


मुंबईत झालेल्या तिसऱ्या हंगामात प्रेक्षकांसाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले होते. संघांच्या रणनीती बैठका माइक्ड-अप टीम बूथ मधून थेट स्ट्रीमिंगवर ऐकण्याची संधी चाहत्यांना देण्यात आली होती. त्यामुळे वैयक्तिक खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुद्धिबळातील संघभावना आणि रणनीती जवळून पाहता आली होती. भारतात बुद्धिबळाची वाढती लोकप्रियता आणि भारतीय खेळाडूंचे जागतिक वर्चस्व पाहता, बेंगळुरूमधील ग्लोबल चेस लीगचा चौथा हंगाम रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags
chessFIDEChess Tournamentsports newsBengaluruChess NewsIndian ChessGlobal Chess League 2026GCL 2026Tech Mahindra
Comments
Add Comment

Australian Cricket Star : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू अडचणीत ! ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात न्यायलयाची मोठी कारवाई

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा माजी सदस्य डेव्हिड वॉर्नर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. या वर्षाच्या

ICC Ranking : आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये मोठा ट्विस्ट! रोहित-विराटला होणार फायदा ?

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Rohit Sharma - Ravi Shastri : 'रोहितने आपल्या खेळीतून टीकाकारांच्या गालावर चपराक लगावली!' – लॉर्ड्समधील शतकानंतर रवी शास्त्रींची रोखठोक प्रतिक्रिया

मुंबई : इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळलेल्या १३८ धावांच्या शानदार शतकी खेळीनंतर भारतीय

Kuldeep Yadav : भारतीय संघाच स्थान नाही, शेवटी कुलदीपने घेतला मोठा निर्णय; आता 'या' देशासाठी खेळणार...

मुंबई : भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) यॉर्कशायर काउंटी क्लबसोबत करार केला. तो या हंगामात संघासाठी आठ

Virat Kohli : इंग्लंड दौऱ्यानंतर विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी

वृंदावन : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर प्रेमानंद

Common Wealth Games 2026 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय संघाची यादी जाहीर! १२६ सदस्यीय ताफ्यात कोण-कोण ?

मुंबई : यंदा कॉमनवेल्थ गेम्स २०२६ संक्षिप्तपणे खेळली जाणार आहे. भारताने १२६ सदस्यीयांची यादी जाहीर केली आहे. यात