Fifa World Cup 2026 : उद्घाटन सामन्यादरम्यान दुर्दैवी घटना ! स्टेडियमबाहेर चाहत्याचा मृत्यू; नेमकं घडलं काय ?

मेक्सिको : फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. मात्र या ऐतिहासिक सामन्यादरम्यान मेक्सिकोच्या अझ्टेका स्टेडिबाहेर एक धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे फुटबॉल विश्वात खळबळ उडाली आहे. सामन्याच्या वेळी स्टेडियमच्या गेट क्रमांक 11 जवळ एका वृद्ध चाहत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती जर्मनीचा नागरिक असून त्या क्यती चे वय 80 वर्ष असल्याचे सांगितले जात आहे. हाफटाइम दरम्यान स्टेडियम परिसरात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ते जमिनीवर कोसळले त्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सीपीआर (CPR) देण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व प्रयत्न वाया गेले. स्टेडियमच्या वैद्यकीय पथकाने त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे काही काळ स्टेडियम परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, हा सामना अझ्टेका स्टेडियमसाठी ऐतिहासिक ठरला होता. 1970 आणि 1986 नंतर तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकाच्या उद्घाटन सामन्याचे यजमानपद भूषवणारे हे जगातील पहिले स्टेडियम बनले आहे.(SPORTS)





मेक्सिकोची विजयी सुरुवात


मैदानावरील सामन्यात मेक्सिकोने प्रभावी खेळ करत दक्षिण आफ्रिकेवर 2-0 अशी मात केली. जुलियन क्विनोन्सने स्पर्धेतील मेक्सिकोचा पहिला गोल नोंदवला, तर अनुभवी स्ट्रायकर राउल जिमेनेझने दुसरा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.या सामन्याची आणखी एक विशेष बाब म्हणजे तीन रेड कार्ड्स. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात उद्घाटन सामन्यात प्रथमच तीन खेळाडूंना रेड कार्ड दाखवण्यात आली, त्यामुळे हा सामना अनेक कारणांनी चर्चेत राहिला.उद्घाटनाच्या जल्लोषात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे फुटबॉल चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, विश्वचषकाच्या सुरुवातीलाच स्पर्धेवर शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे