Ashok Kharat Case : 'या' सरकारी वकिलाच्या एंट्रीने अशोक खरातला फुटला घाम ! आता खरातची सुटका नाहीच

Ashok Kharat Case : नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला अशोक खरात प्रकरणाने हादरवून सोडले आहे. आता याच अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरात प्रकरणात अंधश्रद्धा विरोधी खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सोबतच अहिल्यानगरचे अनुभवी फौजदारी वकील परिमल फळे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खरातची आता सुटका नाहीच अशी चर्चा शहरात रंगली आहे.



आता खरातची सुटका नाहीच !


अशोक खरात सध्या पोलीस आणि ईडीच्या ताब्यात आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station दाखल झालेल्या एकूण ८ वेगवेगळ्या गुन्ह्यांचे कामकाज आता ॲड. उज्ज्वल निकम स्वतः पाहणार आहेत. यासाठी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी अहिल्यानगरचे अनुभवी फौजदारी वकील परिमल फळे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरणातील खटल्याला आता अधिक धार प्राप्त झाली असून संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.



मानधनाचा खर्च गृह विभाग उचलणार


या खटल्यात ॲड. उज्ज्वल निकम यांना सहकार्य करण्यासाठी राज्य शासनाने ॲड. परिमल फळे यांची ‘सहाय्यक विशेष सरकारी वकील’ म्हणून नियुक्ती केली आहे. दोन्ही वकिलांच्या मानधनाचा (फी) खर्च राज्य शासनाचा गृह विभाग उचलणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने ११ जून २०२६ ला या नियुक्तीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारच्या वतीने कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, अशोक खरातविरोधातील न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी निकम-फळे या जोडीवर सोपविण्यात आली आहे.



परिमल फळे फौजदारी कायद्यातील अनुभवी वकील


वकील परिमल फळे हे फौजदारी कायद्यातील अनुभवी वकील म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांचयासोबत काम केलेले आहे. त्यामुळे वकील फळे यांचा अनुभवही तगडा आहे. ॲड. फळे यांनी यापूर्वी राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्य हत्या प्रकरण, नेवासे येथील वकील रियाज पठाण हत्या प्रकरण यांसारख्या गाजलेल्या खटल्यांमध्ये त्यांनी वकील उज्ज्वल निकम यांच्यासोबत सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली होती. याशिवाय रेखा जरे खून प्रकरण, संदीप वारळ हत्या प्रकरणासह अनेक चर्चित खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.



भोंदू खरातवर गंभीर गुन्ह्यांची नोंद


अशोक खरातवर वेगवेगळे गुन्हे दाखल असून सध्या तो कोठडीत आहे. त्याच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकापाठोपाठ ८ वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. त्याच्यावर या ८ गुन्ह्यांमध्ये बलात्कार, गुंगीकारक औषध देणे, फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि फार्महाऊसवर पिस्तूल व जिवंत काडतुसे सापडल्यामुळे आर्म्स ॲक्ट अशा विविध कडक कलमांचा समावेश आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. सरकारवाडा पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

Comments
Add Comment

Nashik : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४६ सराईत गुन्हेगार हद्दपार

Nashik : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी सराईत व

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Nitesh Rane : 'राऊत फाईल्स' उघडल्या तर उद्धव ठाकरेंबद्दल नको ते ऐकायला मिळेल!

- मंत्री नितेश राणे; उद्धवना मुख्यमंत्री करण्यास संजय राऊतांचा कायम विरोधच होता मुंबई : "संजय राऊत हे वरकरणी उद्धव

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Dhule : जंगलात आढळले तरुण-तरुणीचे मृतदेह, धुळ्यात नेमकं काय घडलं ?

Dhule : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम

Anna Bansode : अनधिकृत बांधकामाबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (KUADA) कार्यक्षेत्रातील विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर