संसदेच्या वरिष्ठ सभागृहात 'एनडीए' दोन-तृतीयांश बहुमताच्या उंबरठ्यावर
नवी दिल्ली : देशातल्या १० राज्यांतील २४ नेत्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभेच्या एकूण २७ जागांपैकी तब्बल २४ जागांचा निकाल स्पष्ट झाला असून, यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने १९ जागांवर, तर काँग्रेसने ५ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता केवळ झारखंडमधील दोन आणि मिझोरममधील एका जागेसाठी आगामी १८ जून रोजी मतदान होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख मुंबई : राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता ...
राज्यसभेतील २४ जागांच्या निकालामुळे २४५ सदस्य संख्या असलेल्या सभागृहात 'एनडीए'चे संख्याबळ आता १४९ जागांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. यामुळे वरिष्ठ सभागृहात सत्ताधारी आघाडीची स्थिती कमालीची मजबूत झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पाणीपुरवठा योजनेच्या व्यवस्थापनासाठी तालुकास्तरावर युनिटची निर्मिती मुंबई : सध्या राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या ...
मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केल्यामुळे, भाजपचे तीनही उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडणूक आयोगाने भाजपचे रजनीश अग्रवाल, तरुण चुघ आणि महेश केवट यांना बिनविरोध निर्वाचित घोषित करत प्रमाणपत्रे सुपूर्द केली आहेत. या निर्णयाविरोधात नटराजन यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने मीनाक्षी नटराजन यांची याचिका फेटाळून लावली. "निवडणूक प्रक्रिया सुरू असताना न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 'निवडणूक याचिका' दाखल करणे हाच त्यांच्याकडे एकमेव कायदेशीर पर्याय उपलब्ध आहे," असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई : रस्ते, रेल्वे आणि मेट्रोच्या जाळ्यानंतर ...
टीडीपी , जेडीयू या प्रमुख मित्रपक्षांसह, नामांकित आणि अपक्ष खासदारांच्या पाठिंब्यामुळे एनडीए आघाडी आता राज्यसभेत दोन-तृतीयांश बहुमताच्या अगदी जवळ पोहोचली आहे. या ऐतिहासिक संख्याबळामुळे मोदी सरकारला देशातील महत्त्वाच्या सुधारणा, मोठी आर्थिक विधेयके आणि 'विशेष बहुमताची' आवश्यकता असणारी घटनादुरुस्ती विधेयके कोणत्याही राजकीय अडथळ्याविना संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेणे सुलभ होणार आहे.
NEW DELHI : रशियाकडून केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवरून पाश्चात्य देशांकडून होणाऱ्या टीकेला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चोख प्रत्युत्तर ...
झारखंड येथील दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. जेएमएमचे वैद्यनाथ राम, काँग्रेसचे प्रणव झा आणि भाजपचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मिझोरम येथील एकमेव जागेसाठी सत्ताधारी 'झोरम पीपल्स मूव्हमेंट'चे प्रवक्ते के. लालतलुआंगकिमा आणि मुख्य विरोधी पक्ष 'मिझो नॅशनल फ्रंट'च्या उमेदवार झोथानसांगी ह्मार यांच्यात थेट सामना रंगणार आहे. या जागांचे मतदान १८ जून रोजी पार पडेल आणि त्यानंतर तत्काळ मतमोजणी केली जाईल.





