Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्त करावी- हेमंतदास महाराज; गोदावरी घाट परिसराची केली पाहणी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर कोट्यावधी रूपयांची विकासकामे सुरू आहेत. गोदावरी नदी पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी हेमंतदास महाराज यांनी केली. कुंभमेळ्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने गोदावरीचे पावित्र्य आणि स्वच्छता जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.



तपोवन (Tapovan) साधूग्राम परिसरातील निर्मोही निर्वाणी आखाडा आणि दिगंबर आखाड्यासाठी प्रस्तावित जागांची पाहणी करण्यात आली. श्री ज्ञानदास महाराज यांचे शिष्य संजयदास महाराज, हेमंतदास महाराज आणि मुरलीदास महाराज यांनी रामकुंड परिसराला भेट देत घाटांची आणि विविध धार्मिक स्थळांची पाहणी केली. यावेळी संबंधित सुविधांचा आढावा घेऊन प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच फोटो हनुमान मंदिर परिसराचीही पाहणी करून मंदिर परिसरातील विकासकामे, स्वच्छता आणि संरक्षणाबाबत सूचना करण्यात आल्या. त्यांनी कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच धार्मिक परंपरा, संस्कृती आणि पवित्र स्थळांचे संवर्धन करण्यावर भर दिला.


महाराजांनी प्रशासनाकडे काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. कुंभमेळ्याच्या कालावधीत शहरातील मद्यविक्री व मांसाहार विक्रीची दुकाने बंद ठेवावीत, गोदावरी नदीत कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच रामकुंड परिसरातील आणि शहरातील पुरातन मंदिरांचे जतन व संवर्धन करावे, अशी मागणी त्यांनी केली. मंदिरांच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.



संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचे प्रतीक


साधू-संतांनी सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रशासन, विविध धार्मिक संस्था आणि नागरिक यांनी एकत्रितपणे स्वच्छ, सुरक्षित आणि भव्य कुंभमेळा आयोजित करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

Comments
Add Comment

CJP : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी

सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव काय आहे?

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून आली आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला

Nashik Simhastha Kumbh Mela : गणेशोत्सव २०२६ ठरणार महासिंहस्थ जनजागृतीचे व्यासपीठ, कुंभमेळा प्राधिकरणाकडून ‘गणेश मंडळ स्पर्धेचा' प्रस्ताव

Nashik Simhastha KumbhMela : महासिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची तयारी वेग घेत असताना, गणेशोत्सवाच्या माध्यमातून महासिंहस्थचा संदेश