Nashik : VIP दर्शन घोटाळ्यातील कडलगांच्या जामीनावर आज आठवी सुनावणी

Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिरातील कथित व्हीआयपी दर्शन घोटाळ्यातील प्रमुख संशयित आणि मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग तसेच वसंत कचरू मुर्तडक यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. जिल्हा न्यायालयात (District Court) त्यांच्या जामीन अर्जावर सातव्यांदा सुनावणी होणार होती. मात्र, पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर पडल्याने आता या प्रकरणाची आठवी सुनावणी आज, ११ जून रोजी होणार आहे.


त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी निश्चित होती. मात्र, संशयितांच्या वकिलांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडे वेळ मागितल्याने न्यायालयाने पुढील तारीख दिली. त्यामुळे कडलग आणि इतर संशयितांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम कायम राहिला.



व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट


व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची उकळपट्टी होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. मात्र, अनेक भाविक पुढे येऊन तक्रार करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्र्यंबक पोलिसांनी मंदिर परिसरात गुप्त ‘स्टिंग ऑपरेशन’ राबवत या रॅकेटचा पर्दाफाश केला. दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी (Police) थेट मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, त्यांचे पुतणे ओम व अभिषेक कडलग आणि एजंट गोटीराम पेहरे यांच्यासह अन्य दोघांना पकडून त्यांचा पर्दाफाश केला हाेता.



याप्रकरणी ११ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर १४ एप्रिल रोजी पोलिसांनी कडलग व इतर संशयितांना अटक केली हाेती. गेल्या दोन महिन्यांपासून पुरुषोत्तम कडलग आणि त्याचे साथीदार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. आता ११ जून रोजी होणाऱ्या आठव्या सुनावणीत त्यांना जामीन मिळतो की त्यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Comments
Add Comment

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

Nashik : माणुसकीला काळिमा ! पैशांसाठी ५ दिवसांच्या नवजात बाळाचा आईनेच केला सौदा

Nashik Crime News : नाशिकमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात मातृत्वाला काळीमा फासणारी घटना

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Badlapur Dahi Handi 2026 Accident : सातव्या थरावरून सलामी देताना चिमुकल्या गोविंदाचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि...; बदलापूरमध्ये अनर्थ टळला

बदलापूर : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये एक थरारक घटना घडली. ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’दरम्यान