Metal Pins Found in Birthday Cake in Thane : ठाण्यात वाढदिवसाच्या थीम केकमध्ये निघाल्या धातूच्या पिन्स; ३ वर्षीय मुलाने केकसोबत गिळल्या दोन मेटल पिन्स

ठाणे : वाढदिवस अधिक खास करण्यासाठी थीम (Theme) केकची निवड करणाऱ्या पालकांसाठी धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. ३ वर्षीय रियांशने वाढदिवसाच्या केकवरील चॉकलेटसोबत दोन धातूच्या पिन्स (Metal Pins) गिळल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे कुटुंबीयांना तब्बल ४८ तास चिंतेत दिवस काढावे लागले.


मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात राहणाऱ्या बायोलॉजी शिक्षिका स्नेहा शेलार यांच्या मुलगा रियांशचा वाढदिवस होता. त्यानिमित्त खास थीम (Theme) केक ऑर्डर (Cake Order) करण्यात आला होता. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. यावेळी रियांशने केकवरील चॉकलेट बॉल्स खाल्ले.







मात्र काही वेळानंतर केकच्या सजावटीसाठी (Decoration) ठेवलेल्या चॉकलेट बॉल्सना आधार देण्यासाठी धातूच्या पिन्स (Metal Pins) वापरण्यात आल्याचे घरातील मोठ्या मुलांच्या लक्षात आले. रियांशने चॉकलेट सकट दोन पिन्सही गिळल्या. त्यानंतर त्याला तातडीने ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात (Jupiter Hospital) दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया (Surgery) करण्याची गरज नसल्याचे सांगत पिन्स नैसर्गिकरीत्या (Naturally) शरीरातून बाहेर पडण्याची वाट पाहण्याचा सल्ला दिला. अखेर ४८ तासांनंतर दोन्ही पिन्स शरीरातून बाहेर पडल्या आणि कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.


रियांशची आई स्नेहा शेलार यांनी समाजमाध्यमावरील (Social Media) पोस्टमधून संताप व्यक्त केला. "लहान मुलासाठी केक तयार केला जात असल्याची माहिती असूनही बेकरी चालकाने धातूच्या पिन्स (Metal Pins) वापरल्याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. आमच्यासाठी हा वाढदिवस आनंदाऐवजी भीतीचा अनुभव ठरला," असा आरोप त्यांनी केला. सुदैवाने रियांशची प्रकृती आता स्थिर (Stable) असून तो धोक्याबाहेर आहे. मात्र या घटनेमुळे अन्नसुरक्षा (Food Safety) आणि केक सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Guidelines for Rainwater Harvesting : जुन्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नियमावली

- नगरविकास विभागाचा निर्णय; नवीन जलनिस्सारण जोडणीचा मार्ग सुलभ मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Ashish Shelar : झारखंडमधील विद्यार्थी मारहाणीवर राज-उद्धव ठाकरे गप्प का; मंत्री आशिष शेलार यांचा सवाल

 'मातोश्री' आणि 'शिवतीर्थ'वरून सोयीची

Nashik : त्र्यंबकेश्वर देवस्थानचा व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय

Nashik : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानने व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा

Virar Fake Currency : विरारमध्ये बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश! १ कोटींच्या नकली नोटा जप्त; ३० लाखांत विक्रीचा कट उधळला

वसई : वसई क्राईम ब्रँच युनिट-२ ने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी कारवाई करत १ कोटी रुपये दर्शनी मूल्य असलेल्या

Nashik : चार महिन्यांपूर्वीचा काँक्रिटीकरण झालेला रस्ता पुन्हा फोडला, नाशिक महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Nashik : नाशिक शहरातील सीबीएस ते कॅनडा कॉर्नरदरम्यान (CBS to Canada Corner) अवघ्या चार महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आलेला