Thursday, June 11, 2026

Gold Silver Today Rate : आनंदवार्ता! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; MCX वर चांदी ५,८०० तर सोनं १,५०० रुपयांनी स्वस्त

Gold Silver Today Rate : आनंदवार्ता! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; MCX वर चांदी ५,८०० तर सोनं १,५०० रुपयांनी स्वस्त

मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू असून गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा एकदा मौल्यवान धातूंच्या बाजाराकडे वळले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या दरात तब्बल ५,८०० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली असून एक किलो चांदीचा भाव २,३०,४९३ रुपयांवर आला आहे. त्याचवेळी सोन्याच्या दरातही १,५०२ रुपयांची घसरण झाली असून १० ग्रॅम (एक तोळा) सोन्याचा दर १,४६,४४४ रुपयांवर पोहोचला आहे. (Gold Silver Today Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीवर दबाव कायम आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती, मध्यपूर्वेतील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती यांचा परिणाम जागतिक कमोडिटी बाजारावर होताना दिसत आहे. या घडामोडींमुळे सोन्याचे दर गेल्या सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरल्याचे चित्र आहे. (Gold Silver Today Rate)

कॉमेक्स (COMEX) बाजारात सोन्याचा दर प्रति औंस ४,१३२.८० डॉलरपर्यंत खाली आला आहे, जो मागील वर्षी नोव्हेंबरमधील पातळीपेक्षाही कमी मानला जात आहे. चांदीचा दरही प्रति औंस ६४.५९ डॉलरवर घसरला आहे. जागतिक बाजारातील या घसरणीचा थेट परिणाम भारतीय बाजारावरही होत आहे. (Gold Silver Today Rate)

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असून त्यामुळे जागतिक महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचे लक्ष सुरक्षित गुंतवणुकीऐवजी इतर मालमत्तांकडे वळत असल्याचे दिसत आहे. (Gold Silver Today Rate)

याशिवाय अमेरिकेतील रोजगारवाढीची आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली आल्याने अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर उच्च पातळीवर कायम ठेवले जाण्याची शक्यता वाढली आहे. सोन्यावर कोणतेही व्याज मिळत नसल्यामुळे व्याजदर वाढल्यास गुंतवणूकदार सोन्यापासून दूर राहतात. परिणामी सोन्याच्या मागणीत घट होऊन त्याच्या किंमतींवर दबाव निर्माण होतो. (Gold Silver Today Rate)

आंतरराष्ट्रीय घडामोडी, तेलाच्या किंमती आणि अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमुळे आगामी काळातही सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. (Gold Silver Today Rate)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >