सव्वा महिन्याच्या संसाराचा हृदयद्रावक शेवट, पोटाला दगड बांधला अन्…

Yavatmal News : यवतमाळमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. पोटाला दगड बांधून दोघांनी विहिरीत उडी घेतली. आशिष आणि करिष्मा धानोरकर या दाम्पत्याच्या जीवनाचा असा हृदयद्रावक शेवट होईल कदाचित असे कोणालाही वाटले नसावे. या घटनेनं परिसर हादरला असून हळहळ व्यक्त होत आहे.




पोटाला दगड बांधून विहिरीत उडी


यवतमाळमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याने अवघ्या सव्वा महिन्याच्या संसारानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यासाठी या दाम्पत्याने पोटाला दगड बांधून विहिरीत उडी घेतली. अवघ्या सव्वा महिन्यातच त्यांनी जीवनाची अखेर केली. दोघांनीही विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेनेमुळे यवतमाळ हादरलं असून एकच खळबळ उडाली आहे.


सोमवारी रात्रीच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे ही धक्कादायक घटना घडली. आशिष रमेश धानोरकर (Ashish Ramesh Dhanorkar) आणि करिष्मा आशिष धानोरकर (Karishma Ashish Dhanorkar) असं या दाम्पत्याचं नाव आहे. या दोघांनीही टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दोघेही सुस्वभावी होते. सर्वांशी हसून बोलायचे. मेहनती होते, त्यांनी असा टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, असं स्थानिक म्हणत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आशिष (Ashish Ramesh Dhanorkar) हा एकुलता एक होता.




प्रेमविवाह अन सव्वा महिन्याच्या संसाराचा शेवट


आशिष आणि करिष्मा हे दोघेही कॅटरर्सच्या कामात एकत्र मजूर म्हणून काम करत होते. याचवेळी दोघेही प्रेमात पडले. प्रेमात पडलेल्या या जोडप्याने 4 मे 2026 रोजी लग्न केलं. लग्न होईल की नाही ही धाकधूक असताना दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून एकमेकांना कायमची साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र सोमवारचा दिवस दोघांच्याही आयुष्यात शेवटचा ठरला.


सोमवारी हे दोघेही वणीला जाण्याचे सांगून घराबाहेर पडले. मात्र त्यांनी सगणापूर शिवारातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. दोघांनीही नवरगाव शिवारातील अनिल झाडे यांच्या शेतात आल्यावर पोटाला दगड बांधून विहिरीत उडी घेतली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र हा घातपात आहे का ? असाही संशय अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



दरम्यान, झाडेंच्या शेतात मृतदेह आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् अख्खा गाव विहिरीभोवती जमा झाला. विहिरीच्या बाजूला मोटारसायकल आणि दोघांच्या चपला होत्या. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या