PM Modi - Meloni : ‘मोदींचा ऐतिहासिक महाविक्रम!’ थेट इटलीवरून आल्या खास शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला आहे. सलग सर्वाधिक काळ देशाचे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला आहे. २०१४ मध्ये प्रथमच पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतलेल्या मोदींनी आता सलग १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत भारतीय राजकारणाच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. (PM Modi - Meloni)


या ऐतिहासिक कामगिरीनंतर देश-विदेशातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलनी (Giorgia Meloni) यांनी सोशल मीडियावर खास संदेश पोस्ट करत मोदींचे अभिनंदन केले आहे. (PM Modi - Meloni)




 

मेलोनींचा खास संदेश चर्चेत :


जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, "नरेंद्र मोदी, हार्दिक शुभेच्छा! आज तुम्ही भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान बनला आहात. नुकतीच रोममध्ये आपली पुन्हा भेट झाली. भारतासोबतची विशेष रणनीतिक भागीदारी अधिक मजबूत करताना आनंद होत आहे. यामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण होतील." (PM Modi - Meloni)


मेलोनी यांच्या या संदेशाची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून भारत-इटली संबंधांमधील वाढत्या सहकार्याचाही त्यातून उल्लेख करण्यात आला आहे.



नेहरूंचा विक्रम मोडला :


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ४,३९९ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यासह त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सत्तेवर राहण्याचा विक्रम मागे टाकला आहे. या गणनेत नेहरू यांच्या १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या कार्यकाळाचा आधार घेण्यात आला आहे. कारण १९४७ ते १९५२ या काळात ते स्वतंत्र भारताच्या अंतरिम सरकारचे प्रमुख होते. (PM Modi - Meloni)



तीन निवडणुका, तीन विजय :


नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने २०१४, २०१९ आणि २०२४ या सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला. त्यामुळे ते सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले. त्यांच्या नेतृत्वात भारताने आर्थिक, पायाभूत, डिजिटल आणि परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. (PM Modi - Meloni)



जागतिक स्तरावर वाढलेला प्रभाव :


गेल्या दशकात भारताने जागतिक राजकारणात आपली ताकद अधिक ठळकपणे दाखवली आहे. G20 अध्यक्षपद, ग्लोबल साऊथचा प्रभावी आवाज, वाढती अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय कूटनीतीमधील सक्रिय भूमिका यामुळे मोदींच्या नेतृत्वाची जगभरात दखल घेतली जात आहे. या ऐतिहासिक टप्प्यानंतर आता मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत कोणते नवे विक्रम प्रस्थापित करणार, याकडे देशासह जगाचे लक्ष लागले आहे. (PM Modi - Meloni)


 

Comments
Add Comment

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले