Dhule Crime : प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर शाळकरी मुलीसोबत संतापजनक कृत्य केलं

Dhule Crime News : धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलीस ठाणे (West Deopur Police Station) हद्दीत एक संतापजनक घटना समोर आली आहे. 15 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीला प्रेमाचं आणि लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना याठिकाणी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात तीन नराधम तरुणांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



नेमकी घटना काय ?


धुळे येथील नकाणे (Nakane) गावातील १० वीत शिकत असलेल्या एका मुलीला गावातीलच तीन तरुणांनी संगनमत करून आपल्या जाळ्यात ओढलं होतं. या तिघांनीही तिच्यावर सातत्याने अत्याचार केले. गेल्या 11 महिन्यांपासून हा छळ आणि घृणास्पद प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी तिघेही मित्र आहे आणि संगनमताने तिघांनी हे किळसवाणे कृत्य केले. प्राथमिक माहितीनुसार, एका आरोपीने आधी पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी जवळीक साधली. मात्र काही दिवसांनंतर मुलाचे वर्तन, चुकीच्या सवयी आणि व्यसनाधीनता मुलीच्या लक्षात आल्या. त्यांनतर पीडितेने त्याच्यापासून स्वतःला दूर केलं.


या गोष्टीचा राग मनात धरून मुख्य आरोपीने पीडित मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. यानंतर, याच तरुणाच्या दुसऱ्या एका मित्राने मध्यस्थीचा आव आणला. मुलीच्या परिस्थितीचा फायदा उचलला. त्याने मुलीला समजावण्याच्या बहाण्याने पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून तिला तिसऱ्या एका तरुणाच्या जाळ्यात ढकलले. पीडितेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत या नराधमांनी तिला देवपूर भागातील एका खासगी कॅफेमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर वारंवार अत्याचार केले.



पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू


पीडित मुलीच्या सोबत घडलेला हा संपूर्ण प्रकार जेव्हा तिच्या कुटुंबीयांना समजला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ पश्चिम देवपूर पोलीस ठाणे (West Deopur Police Station) गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून तातडीने पावले उचलली आणि तिन्ही संशयित आरोपींविरुद्ध पॉस्को (POCSO) कायद्यासह विविध कलमांन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत.


पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून आरोपींच्या मुसक्या आवळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments
Add Comment

Badlapur Dahi Handi 2026 Accident : सातव्या थरावरून सलामी देताना चिमुकल्या गोविंदाचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि...; बदलापूरमध्ये अनर्थ टळला

बदलापूर : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये एक थरारक घटना घडली. ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’दरम्यान

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Nisha Bhagat Fraud Case : प्रसिद्ध मराठी लोकगायिकेविरोधात गुन्हा दाखल; सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप

कल्याण : प्रसिद्ध मराठी लोकगायिका निशा भगत आणि अनिल आहिरे यांच्याविरोधात सरकारी नोकरीच्या आमिषाने २० लाख रुपये

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर