Wednesday, June 10, 2026

Ratnagiri News :रत्नागिरी हादरली ! तीन मित्रांचा बुडून मृत्यू

Ratnagiri News :रत्नागिरी हादरली ! तीन मित्रांचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.खेड शहरातील भोस्ते गावाच्या सीमेवर जगबुडी नदीत चार मित्र पोहायला गेले होते. त्या चौघांपैकी तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

नेमकं घडलं काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी व पोहण्याचा आनंद घेण्यासाठी चार मित्र जगबुडी नदीच्या पात्रात उतरले होते. भोस्ते गावाच्या परिसरात नदी खोल असल्याचं सांगितलं जातं, विशेषतः ज्या भागात हे चौघे पोहत होते तो भाग अतिशय खोल असल्याचे सांगतात. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा व्यवस्थित अंदाज आला नाही आणि एकत्र पोहत असलेले चार मित्र बुडू लागले. ते बुडत असल्याचे बघून स्थानिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक एकाला वाचवू शकले पण तीन जणांचा बुडून मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच चौघांच्या नातलगांनी घटनास्थळी धाव घेतली. चौघांपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाल्याचे बघून एकदम शोककळा पसरली. नातेवाईक आक्रोश करू लागले. खेड पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

तीन तरुणांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ

घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी धावले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे. नदी, धरणे आणि डोहांच्या परिसरात पर्यटक आणि तरुणांची मोठी गर्दी असते, पण अनेकदा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दुर्घटना घडतात. त्यामुळे पर्यटनाची, पोहण्याची, साहसी खेळांची मजा लुटताना खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तीन तरुण मुलांच्या अकाली निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा