Navale Bridge Accident : पुण्यात नवले पुलावर भीषण अपघात; सिमेंट टँकर दुचाकीवर उलटला, तरुणाचा जागीच मृत्यू











पुणे: पुण्यातील नवले पूल (Navale bridge) परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताची (Accident) घटना घडली असून एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास कात्रज बायपासवरून येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या 10 टायरी टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगातील टँकर अचानक रस्त्यावर उलटला आणि त्याचवेळी तेथून जात असलेल्या दुचाकीवर कोसळला. या अपघातात दुचाकीस्वार रामेश्वर मच्छिंद्र उगले (वय 31) यांचा जागीच मृत्यू झाला. रामेश्वर हे मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या कात्रज येथे वास्तव्यास होते.



अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. सिमेंटने भरलेला अवजड टँकर रस्त्यावर आडवा झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पीएमआरडीए, पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.


टँकर हटवण्यासाठी आणि अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्यासाठी तब्बल तीन हायड्रोलिक क्रेनची मदत घ्यावी लागली. जवळपास तासाभराच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.


दरम्यान, अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या मार्गावरील अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.





Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि