Crime News : गोळ्या घाला रे गोळ्या..." म्हणत FDA अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; गुटखा माफियांचा छत्रपती संभाजीनगरात थरार

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील गंगापूर परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना धमकावत आरोपींनी थेट त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी गंगापूर परिसरात एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अधिकारी प्रज्ञा सुरसे, विवेक पाटील, फरीद सिद्दीकी आणि अमोल कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली.



तपासणीदरम्यान ट्रकमध्ये 25 ते 30 पोती गुटखा आणि पान मसाल्याचा साठा आढळून आला. मात्र कारवाई सुरू असतानाच काही संशयित तरुण दुचाकीवरून पाळत ठेवत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.


दरम्यान, एक स्कॉर्पिओ आणि एक क्रेटा कार घटनास्थळी दाखल झाली. स्कॉर्पिओमधील काही जणांनी "गोळ्या घाला रे गोळ्या..." अशी आरोळी देत दहशत निर्माण केली. यानंतर स्कॉर्पिओ चालकाने अधिकाऱ्यांच्या दिशेने वाहन घालण्याचा प्रयत्न केला. या गोंधळाचा फायदा घेत एका आरोपीने गुटख्याने भरलेला ट्रक ताब्यात घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.



या हल्ल्यात अधिकारी थोडक्यात बचावले. घटनेनंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून शासकीय कामात अडथळा, धमकी आणि जीवघेणा हल्ला यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपी आणि ट्रकचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून