Hardik Pandya : आधी फिट त्यानंतर अनफिट ! अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून हार्दिक बाहेर, रोहित शर्मा सज्ज ?

Bangalore : भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. पहिला विराट त्यानंतर आता हार्दिक पांड्या संघातून बाहेर झाल्याने संघला दुहेरी धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी (९ मे) बीसीसीआयने हार्दिक पांड्याला फिट घोषित केले होते. बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये आठवडाभर फिटनेस टेस्ट आणि सराव केल्यानंतर त्याला खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र शेवटच्या क्षणी दुखापत झाल्यामुळे तो आता संघातून बाहेर झाला आहे. तो आता पुनर्वसनासाठी (Rehabilitation) बंगळुरूमध्येच थांबणार आहे.(SPORTS)




शेवटच्या क्षणी दुखापत


सूत्रांच्या माहितीनुसार, हार्दिकने सुरुवातील सर्व फिटनेस चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या होत्या.पण ऐनवेळी त्याच्या क्वॉड्रिसेप्स (Quadriceps Strain -मांडीचे स्नायू) ला ताण झाल्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला. बीसीसीआयने त्याला दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.हार्दिकच्या जागी संघात कोणाला स्थान मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत त्याचा समावेश होईल की नाही ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.




रोहित शर्मा पूर्णपणे फिट


आफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने रोहित शर्मा पूर्णपणे फिट असल्याचे सांगीतले आहे.मात्र विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार आहे.तर त्याच्या जागी यशस्वी जयस्वालला संघात संधी देण्यात आली आहे.



हार्दिक २०२७ च्या वर्ल्ड कपसाठी महत्त्वाचा- अजित आगरकर


भारतीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले की,हार्दिकला २०२७ च्या वर्ल्ड कपसाठी पूर्णपणे फिट ठेवणे हे भारतीय संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणूनच त्याला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. अजित आगरकर म्हणाले की, हार्दिक हा वनडे संघाचा जस्प्रीत बुमराह प्रमाणे महत्त्वाचा खेळाडू आहे. यामुळे त्याच्या फिटनेसवर आमचे मुख्य ध्येये आहे. म्हणूनच त्याला विश्रांती देत त्याच्या जागी नितीश रेड्डी सारख्या युवा खेळाडुला टी-२० संघात संधी देण्यात येईल.

Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला