Ben Stokes : 'लॉर्ड्सच्या जल्लोषानंतर रस्त्यावर राडा!' बेन स्टोक्सच्या व्हायरल व्हिडिओने खळबळ; इंग्लंडकडून मोठ्या कारवाईचे संकेत

इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवल्यानंतर झालेल्या सेलिब्रेशनदरम्यान नाइटक्लबबाहेर घडलेल्या कथित हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये स्टोक्स आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन काही व्यक्तींशी रस्त्यावर वाद घालताना दिसत असून, त्यामुळे इंग्लंड क्रिकेटमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Ben Stokes)



नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. काही तासांपूर्वीच इंग्लंडने लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंडचा 115 धावांनी पराभव करत मालिकेची विजयी सुरुवात केली होती. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी संघातील खेळाडू एका नाइटक्लबमध्ये गेले होते. मात्र, क्लबबाहेर पडताच स्टोक्स, ॲटकिन्सन आणि काही अन्य व्यक्तींमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. (Ben Stokes)



व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक होताना दिसते. त्यानंतर धक्काबुक्की आणि झटापटीचे दृश्य समोर येते. काही क्षणांतच परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसते आणि एक व्यक्ती रस्त्यावर कोसळल्याचाही दावा केला जात आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून क्रिकेटविश्वातही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Ben Stokes)



ECB ने सुरू केली चौकशी :


या घटनेची गंभीर दखल घेत इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने अधिकृत चौकशी सुरू केली आहे. बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले की, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर संघाच्या शिस्तभंगाशी संबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचा तपास केला जात आहे. ECB च्या माहितीनुसार, स्टोक्स आणि ॲटकिन्सन हे दोघेही संबंधित नाइटक्लबमध्ये उपस्थित होते. घटनेबाबत अधिक माहिती गोळा केली जात असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. विशेष म्हणजे हे प्रकरण क्रिकेट रेग्युलेटरकडेही सोपवण्यात आले आहे. (Ben Stokes)



कर्णधारपद धोक्यात?


या व्हिडिओनंतर इंग्लंडच्या माध्यमांमध्ये बेन स्टोक्सच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. काही वृत्तांमध्ये त्यांच्या भवितव्याबाबत तर्क-वितर्क लावले जात असले तरी ECB ने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. (Ben Stokes)



दरम्यान, इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन स्टोक्सच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. त्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, संपूर्ण सत्य समोर येण्यापूर्वी कोणालाही दोषी ठरवणे योग्य नाही. हार्मिसन म्हणाला, "बेन स्टोक्स हा उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. संपूर्ण माहिती समोर आल्यानंतरच या प्रकरणावर मत व्यक्त केले पाहिजे. जर त्याच्याकडून काही चूक झाली असेल, तर त्यालाही त्याची जाणीव होईल आणि तो योग्य निर्णय घेईल." (Ben Stokes)



इंग्लंड संघासाठी नवी डोकेदुखी :


व्हायरल व्हिडिओमुळे इंग्लंड क्रिकेट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ECB च्या चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, स्टोक्स आणि ॲटकिन्सनवर कोणती कारवाई होते आणि त्याचा इंग्लंडच्या आगामी मालिकांवर काय परिणाम होतो, याकडे आता संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. आगामी महत्त्वाच्या मालिकांपूर्वी निर्माण झालेला हा वाद इंग्लंड संघासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ben Stokes)




Comments
Add Comment

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा

FIH Hockey World Cup : अर्जेंटिनाला महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद; नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात

ॲमस्टेलवीन : अर्जेंटिनाने महिला हॉकी विश्वचषक जिंकला. एका रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी सह-यजमान नेदरलँड्सला