Eknath Shinde : 'शिवसेनेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ; राज्यभरातून प्रवेशाचा ओघ कायम'

नंदनवन निवासस्थानी विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश


विकास, बाळासाहेबांचे विचार आणि मोदींच्या नेतृत्वावर शिंदेंचा भर


नव्या सदस्यांच्या भागातील विकासकामांना प्राधान्य देण्याची दिली ग्वाही


मुंबई : राज्यातील मुंबई, नांदेड, सोलापूर, पालघर, सातारा आणि ठाणे जिल्ह्यातील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज मुंबईतील नंदनवन निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करताना शिवसेनेवरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचे सांगितले.



शिंदे म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत असून त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. राज्यभरातून शिवसेनेत प्रवेशाचा ओघ सातत्याने सुरू असून हा पक्षाच्या विचारांवरील आणि नेतृत्वावरील वाढत्या विश्वासाचा पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेत शिवसेना काम करत आहे. “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हा बाळासाहेबांचा मूलमंत्र घेऊन पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विकासकामांमुळे आणि जनतेच्या विश्वासामुळे मोठ्या संख्येने लोक शिवसेनेत प्रवेश करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



आज झालेल्या पक्षप्रवेशात प्रामुख्याने उबाठा गटाचे वरळीतील शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी, उपशाखा संघटक मीना पाथरे, रजनी कोळी, प्रतिभा दळवी, नांदेड येथील रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि अखिल भारतीय कैकाडी समाजाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश हसापूरे, पालघर जिल्ह्यातील उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागप्रमुख प्रवीण गवळी, संतोष महाले, योगेश भानुशाली, मालती गवळी आणि अनेक सरपंच उपसरपंच, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष राम बनसोडे, कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष भैरवनाथ वाघमारे, सातारा जिल्ह्यातील कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज हाती भगवा घेऊन शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.



राज्यातील ठाणे, पालघर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर यांसह विविध जिल्ह्यांमधून दररोज पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. निवडणुका नसतानाही मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला हा प्रवेश पक्षाच्या वाढत्या जनाधाराचे द्योतक असल्याचे शिंदे म्हणाले. नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भागातील विकासकामांना आणि विकास प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.



यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाही गौरव केला. शिंदे म्हणाले की, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा विक्रम प्रस्थापित करणार असून सलग बारा वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून कार्य करण्याचा टप्पा पूर्ण करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकास आणि प्रगतीच्या नव्या उंची गाठल्या आहेत. राष्ट्रहिताला प्राधान्य देत त्यांनी भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली आहे. शिवसेना हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) प्रमुख घटक पक्ष असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले. मोदी यांच्या यशस्वी कार्यकाळाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारमुळे विकासाला अभूतपूर्व गती मिळाली असून याच विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने लोक शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी शिवसेना यापुढेही अधिक जोमाने कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Kriti Sanon Raksha Bandhan Ad : ट्रोलिंगचा दणका! क्रिती सेननला बसला मोठा धक्का; वादानंतर ब्रँडने जाहिरातच घेतली मागे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad  : अभिनेत्री क्रिती सेनन रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. तिच्या

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१